सुखदुःखात मी नित्य डूंबलो
अंतरी वेदनांच उरली नाही
वाटसरु मी अनवट वाटेवरचा
चालायचे कधी थांबलो नाही
जगणारा मी एक मुक्त कलंदर
दु:श्वास कुणाचाच केला नाही
जीणे रिते , खरे सुखशांतीचे
मी हव्यासात गुंतलोच नाही
निर्माल्य जळात मुक्त वाहते
हे सत्य शाश्वत लपले नाही
जन्म उदरी तर अंत स्मशानी
हा न्याय कुणास चुकला नाही
********
–वि.ग.सातपुते.(भावकवी)
(9766544908)
रचना क्र. ३२०
५/११/२०२२
Leave a Reply