एकटाच बसलो होतो, खोलीमध्यें शांत
करमणूक करीत होते, दुरदर्शन आत..१,
दूरीवरील व्यक्ती बघूनी, शब्द त्याचे ऐके
केवळ चावी फिरवितां क्षणी, दृष्य दुजे देखे…२,
जगामधली सर्व ठिकाणें, खोलीत अदृष्य तीं
साधनांचा उपयोग करीता, जाण त्याची येती….३,
वातावरण निसर्गाने, व्यापले सर्व जगी
सुक्ष्मापासूनी अनंततेचे, गुण एकाचे अंगी….४,
तेथे आहे जे येथेही, व्यापूनी सर्व स्थळी
ब्रह्माडांची व्यापकता, बिंदूत एका सगळी….५
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply