प्रसन्न मुद्रा, स्नेहाळ हास्य आणि मधासारखा गोड गळा लाभलेल्या सुमन कल्याणपूर यांचे नाव आजही संगीत क्षेत्रात अदबीने घेतले जाते. कोणत्याही वादात न पडणाऱ्या सुमनताई मितभाषी असून, त्यांचे जीवन साधे, सुंदर आहे.
या ज्येष्ठ गायिकेचे जीवनातील अनेक रंग मंगला खाडिलकर यांनी ‘सुमनसुगंध’मधून उलगडले आहेत. ढाक्यात रहात असतानाच लहानग्या सुमनला वेड लागले. मुंबईत आल्यावर त्यांनी संगीताचे धडे गिरवायला सुरवात केली. गोड व नाजूक गळ्याच्या सुमनताई गाण्यातील कोणतीही गोष्ट लवकर आत्मसात करीत असत.
१९५३मध्ये ‘शुक्राची चांदणी’ या चित्रपटासाठी त्यांनी प्रथम गाण्याचे रेकॉर्डिंग केले. ही चांदणी पडद्यावर कधी उगवली नाही तरी त्यानिमित्ताने सुमनताईंचे हिंदी चित्रपटातून गायिका म्हणून पदार्पण झाले.
साधारण १९८४ पर्यंत त्यांनी १३ भाषांमध्ये शेकडो गाणी गायली. सुमनताईंचा गळा जसा तरल आहे, तसेच त्यांच्या हातात नाजूक कलाकुसरीचे कसब आहे. स्केचेस, पोट्रेटमध्ये हुबेहुबपणा त्या आणतात. तसेच झाडांची निगराणी त्या कौशल्याने करतात. पाककलाकौशल्यासाठी त्या प्रसिद्धच आहे. त्यांचे हे सर्व पैलू, संगीत, कारकीर्द, कौटुंबिक जीवन या पुस्तकातून उलगडले आहे.
-माहितीपर, मार्गदर्शनपर
Leave a Reply