आज २७ डिसेंबर आज चरित्रकार सुमती देवस्थळे यांचा जन्म २७ डिसेंबर १९२७ रोजी झाला. सुमती देवस्थळे यांची अत्यंत अभ्यासपूर्ण आणि लालित्यपूर्ण भाषेत सर्वच चरित्रं अत्यंत लोकप्रिय झाली होती. टॉलस्टॉय एक माणूस, मॅक्झिम गॉर्की, छाया व ज्योती, एक विचारवंत (मार्क्स), अल्बर्ट श्वाइत्झर, सप्तर्षी आणि अरुंधती अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. सप्तर्षी आणि अरुंधती या पुस्तकात त्यांनी आठ प्रतिभावंतांच्या चरितकथा मांडल्या. टॉलस्टॉय एक माणूस यात टॉलस्टॉयचे चरित्र लिहिताना.
विश्वशांतीचा मार्गदर्शक, अलौकिक प्रतिभासंपन्न साहित्यिक, दीन-दुबळ्यांचा कैवारी, सत्याचा उपासक, अभिनव प्रयोग करणारा शिक्षणशास्त्रज्ञ, अविरतपणे आत्मशोधनात मग्न असणारा, विश्वबंधुत्वाचा संदेश देणारा, शांतीने प्रतिकार करा असा आग्रह धरणारा टॉलस्टॉय एकीकडे दिसतो. तर दुसरीकडे ‘वॉर ऑण्ड पीस’सारखे युद्धविरोधी लिखाण लिहिलेला, मात्र तरुणपणी स्वत: आघाडीवर राहून लढलेला, गरिबांचा कळवळा असला तरी कुटुंबाचे हाल नको,या सबबीखाली जमीनदारी थाटात राहणारा, वेगवेगळ्या क्षेत्रांत शिरुनही त्यात सातत्य न टिकवणारा, संयमाचा मंत्र सांगूनही स्वत: विषयासक्त असणारा असा टॉलस्टॉय आहे असे त्यांनी दाखवून दिले.
सुमती देवस्थळे यांचे २२ जानेवारी १९८२ रोजी निधन झालं.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट