प्रसिद्ध बंगाली व हिंदी अभिनेत्री सुमिता संन्याल यांचा जन्म ९ ऑक्टोबर १९४५ रोजी दार्जिलिंग येथे झाला. सुमिता संन्याल यांचे खरे नाव मंजुळा संन्याल होते. पण पहिल्या चित्रपटासाठी त्यांनी स्वतःचे नाव सुचारिता असे ठेवले. पण फिल्ममेकर कनक मुखोपाध्याय यांनी तिचे नाव सुमिता केले. त्यांनी १९६० साली बंगाली चित्रपट ‘खोका बाबुर प्रत्याबर्तन’द्वारे चित्रपट सृष्टीत प्रवेश केला होता. १९७० मध्ये ‘सगीना महतो’ चित्रपटात तिने दिलीप कुमार यांच्याबरोबर काम केले होते.
सुमिता संन्याल यांनी ४०हून अधिक बंगाली भाषेतील सिनेमे केले. तर हिंदीमध्ये त्यांनी गुड्डी, मेरे अपने, आशीर्वाद, कुहेली या सिनेमांमध्ये काम केले होते. तसेच काही हिंदी नाटक-मालिकांतही त्यांनी काम केले होते. १९७१ मध्ये आलेल्या ‘आनंद’ या सिनेमात सुमिता यांनी अमिताभ बच्चन यांची प्रेयसी रेणू ही भूमिका साकारली होती. आनंद’च्या लोकप्रियतेच्या काळात पंचविशी नुकतीच ओलांडलेल्या या सोज्वळ अभिनेत्रीने तिच्या अभिनय आणि रूपाने त्या जमान्यातील तरुणाईला अक्षरश: वेड लावले. सुमिता संन्याल यांनी एडिटर सुबोध रॉय यांच्याशी लग्न केले होते. सुमिता संन्याल यांचे ९ जुलै २०१७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
सुमिता संन्याल यांच्यावर चित्रित झालेली काही गाणी.
इक था बचपन
ना जिया लागे ना
ना जिया लागे ना बंगाली मध्ये गाणे
झिर झिर बरसे सावनी आखियां
https://www.youtube.com/watch?v=QbwjZVo0dq0
Leave a Reply