गयाना येथे दुस-या कसोटीत हे शतक पूर्ण झाले. नंतरच्या कसोटीत एक आणि त्यानंतरच्या कसोटीत दोन असा हा धडाका सुरू राहिला. कारकीर्दीच्या पहिल्याच मालिकेत ७७४ धावांचा त्यांचा विक्रम अद्याप अबाधित आहे.
१९७१ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणा-या गावसकरांनी कसोटीत १० हजारापेक्षा जास्त धावा काढल्या आहेत. हा टप्पा ओलांडणारे ते पहिले खेळाडू. वेस्ट इंडिजमधील पदार्पणाच्या कसोटी मालिकेत त्यांनी ७७४ धावा काढून मालिका जिंकून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता. त्यानंतर त्यांची बॅट निवृत्तीपर्यंत तळपत राहिली. १९८३ मध्ये त्यांनी डोनाल्ड ब्रॅडमन यांचा सर्वाधिक कसोटी शतकांचा (२९ शतके) हा विक्रम मोडला.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply