नवीन लेखन...

सनसेट अपियरन्स

डॉक्टर जेनर जोसेफ हे प्रसिद्ध बालरोग तज्ञ व  शास्त्रज्ञ होते. निसर्ग प्रेमी होते. त्यांनी आपले घर समुद्र किनाऱ्यावर बांधले होते.  रोज सूर्यास्त समयी ग्यालरीत बसून समुद्राच्या पैलतीरी आकाशातून मावळनाऱ्या सूर्याला बघताना त्यांना खूप आनंद वाटत असे.

एकदा त्यांच्या क्लिनिकमध्ये दोन तीन महिन्याच्या बालकाला आणले गेले. मुलाचे डोके खुपच मोठे होते. कपाळ भव्य, परंतु नाक तोंड डोळे त्यामानाने लहान होते.  जन्मत: हा  दोष त्या मुलामध्ये असल्याचे त्यांना कळले. त्यांचे ज्ञान व शोधक बुद्धी त्यांना शांत  बसू देईना. त्याकाळी वैद्यकीय शास्त्र फार  प्रगत  नव्हते. आधुनिक उपकरणे,  यंत्रे उपलब्ध नव्हती. विचार आणि तर्क ह्यावर जास्त भरवसा होता. ते त्या बालकावर  त्याच्या रोगाची काय कारणे असतील,  ह्यावर प्रत्येक अंगाने टिपणी करू लागले. आपला  बराचसा  वेळ ते त्या बालक व त्याच्या रोगावर केंद्रित करू लागले.

त्या बालकाच्या  मेंदू व मेंदूच्या  सभोवताली  असलेल्या द्रवाचे  ( cerebro  spinal  fluid )    प्रमाण त्या रोगांत बरेच वाढलेले त्यांच्या लक्षात आले. त्याचबरोबर त्या द्रवाने  मेंदूवर व इतर  अवयवावर एक दाब निर्माण केलेला त्यांना कळले. त्यांनी त्या विकाराचे नांव Hydro  Cephalus  असे ठेवले. अशाच केसेसवर  ते लक्ष केंद्रित करू लागले.   त्यावरचे आजही  मान्यता पावलेले उपचार  त्यांनी  सुचविले होते.

ह्याच Hydro -Cephalus  विषयांत  एक गमतीदार निरीक्षण त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्या बालकाच्या डोळ्याचे खूप बारकाईने पाहणी केली. जेंव्हा कोणतेही मूल आपले डोळे पूर्ण उघडते, म्हणजे डोळ्याच्या पापण्या उघडलेल्या असतात,  डोळ्याचा  मध्य काळा भाग, ज्याला Cornia म्हणतात   व सभोवताली पांढरा भाग ज्याला Sclera म्हणतात तो  दिसतो. काळा भाग गोलाकार असून मध्यभागी असतो व इतर भाग पांढरा असतो. ह्या विकारांत मधला भाग काळा असलेला अर्ध गोलाकार असा दिसतो. ह्याचे कारण मेंदूतील वाढलेल्या द्रवाचा दाब हा डोळ्याच्या बुबुळावर पडून ती पुढे सरकतात. फिरली जातात. आणि ती काळी टिकी Cornia  अर्ध गोलाकार बनत तशी दिसू लागते. त्यांनी त्यांच्या निरीक्षणाला मावळत्या  सूर्याची  उपमा दिली. The Cornia and   slera  around  look  like  Sun -Set  Appearance   असे त्यांनी त्याचे प्रथम वर्णन नोंदविले.
तेंव्हा पासूनच अशा विकारामधली डोळ्यामध्ये होणाऱ्या बदलला कायमचे Sun -Set Appearence हेच नांव पडले.

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..