ज्युलिओ रिबेरो १९५३ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. ज्युलिओ फ्रांसिस रिबेरो हे त्यांचे पूर्ण नाव. त्यांनी मुंबईचे २१ वे पोलिस आयुक्त म्हणून त्यांनी १९८२ ते १९८६ या काळात काम पाहिले आहे. त्यांचा जन्म ५ मे १९२९ रोजी झाला.
त्यांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. गुजरातचे पोलिस महासंचालक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. ते पंजाबचे डीजीपी राहिले आहेत. १९८९ मध्ये ते पोलिस दलातून निवृत्त झाले. पंजाबमधला असंतोष मोडून काढणारे पोलिस अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.
रिबेरो यांनी केंद्रीय गृहमंत्रालयात विशेष गृहसचिव म्हणून काम केले. पंजाब सरकारचे सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केले.
शीख अतीरेक्यांनी ऑपरेशन ब्लू स्टारचा बदला म्हणून यांच्यावर दोनदा प्राणघातक हल्ला केला होता.
१९८७ मध्ये भारत सरकार ने जे. एफ. रिबेरो यांना त्यांच्या प्रशासकीय सेवे साठी पद्म भूषण पुरस्काराने सम्मानित केले होते.
निवृत्तीनंतर १९८९-९३ पर्यंत रोमानियात भारताचे राजदूत म्हणून त्यांनी काम केले.
जे. एफ. रिबेरो यांनी ‘बुलेट फॉर बुलेट’ या नावाने इंग्रजी आत्मचरित्र लिहिले आहे. यात त्यांनी ऑपरेशन ब्लू स्टार ते रूमानियातील राजदूत व नंतर निवृत्ती या संपूर्ण प्रवासातील थरारक घटनांचे चित्रण केले आहे. मंजिरी दामले यांनी या आत्मचरीत्राचा मराठीत अनुवाद केला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply