दक्षिणेचे सुपरस्टार म्हणून प्रसिद्ध असलेले कमल हासन यांचा जन्म ७ नोव्हेंबर १९५४ रोजी परमकुडी, चेन्नई येथे झाला.
१९५९ मध्ये वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी त्यांनी कलतूर कन्नम्मा या तमिळ भाषेतील चित्रपटाद्वारे बालकलाकार म्हणून करिअरला सुरुवात केली होती. १९७५ साली ‘अपूर्व रागंगल’ हा त्यांचा पहिला लीड हीरो असलेला सिनेमा होता. यामध्ये त्यांनी त्यांच्या वयापेक्षा मोठ्या स्त्रीच्या प्रियकराची भूमिका वठवली होती.
बॉलिवूडमध्ये त्यांनी ‘एक दुजे के लिए’ या सिनेमाद्वारे पदार्पण केले होते. हा सिनेमा यशस्वी ठरला होता. त्यानंतर त्यांनी ‘सागर’, ‘गिरफ्तार’, ‘जरा सी जिंदगी’, ‘राज तिलक’, ‘एक नई पहेली’, ‘देखा प्यार तुम्हारा’, ‘चाची ४२०’, ‘हे राम’, ‘विश्वरूपम्’ यांसह ब-याच हिंदी सिनेमांत अभिनय केला होता. त्यांनी अभिनय केलेले मूंद्रम पिरै (इ.स. १९८२), नायगन(इ.स. १९८७), हे राम (इ.स. २०००), विरुमांदी (इ.स. २००४), दशावतारम् (इ.स. २००८) हे चित्रपट विशेष गाजले. कमल हासनच्या अनेक चित्रपटांच्या हिंदी आवृत्त्या निघाल्या आहेत. काही चित्रपट तर मूळ हिंदीमध्येच काढलेले आहेत. कमल हासन यांनी १९० चित्रपटांत भूमिका केल्या आहेत.
कमल हासन यांनी १९७८ साली वाणी गणपतीसोबत पहिले लग्न केले होते. दहा वर्षे हे लग्न टिकले आणि १९८८ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर अभिनेत्री सारिकाची त्यांच्या आयुष्यात एन्ट्री झाली. कमल आणि सारिका यांनी १९८८ मध्ये लग्न केले.
त्यांना श्रुती आणि अक्षरा या दोन मुली आहेत. २०१४ मध्ये कमल हासन यांना भारत सरकारने पद्मभूषण देऊन सन्मानित केले.
— संजीव वेलणकर
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply