नवीन लेखन...

सुप्रभात by Mg Hector

आजही morning walk ला जाताना सगळी पूर्वतयारी नीटच केली होती.. jogging shoes, heart rate calculator watch, नेहेमीची insulated ‘नॉन-प्लास्टिक’ water bottle, नॅपकिन घाम पुसायला, आणि ऑफ कोर्स माझा ब्लू टूथ हेडफोन विथ रेडिओ फेसिलिटी. तो तर मस्टच आहे! सायराच्या Morning beats सोबत पाय कसे आपोआप beats पकडतात! मग रस्त्यावर येणारी माणसं, बाजूचा कचरा, उगाच मध्येच फिरणारी कुत्री, गाई-म्हशी, सगळे आपोआप नजरेआड होतात.. फक्त मी, माझ्या समोरचा काळा रस्ता, आणि माझ्या ह्या सकाळच्या टार्गेटकडे मला वेगाने पळवणारी माझी फेवरेट RJ सायरा.

पण आजचा दिवसच कदाचित नीट सुरू झाला नव्हता. लिफ्टमधून खाली आलो, आणि लक्षात आलं की एका shoeची लेस सुटलेली आहे. बेसमेंटमध्येच थांबून पुन्हा घट्ट बांधली, आणि निघालो माझ्या आवडत्या morning ritual कडे. आज पाऊस नव्हता, पण हवा जरा ढगाळ होती. म्हणूनच की काय रेडिओ सिग्नलमध्ये थोडी खरखर ऐकू येत होती. थोड्या वेळाने माझ्या नेहेमीच्या jogging ट्रॅकवर पोचलो, तशी रेंज छान मिळाली. आता जोषात मस्त warm up सुरू केलं. थोडं sweating सुरूच झालं असेल, एवढ्यात compoundच्या बाहेरून चक्क Red Mg Hector गेली! आईच्या गावात!!

ह्या s##y red कलरसाठी तर मी कधीपासून showroomवाल्याला सांगून ठेवलेलं! परवा तर तो ईर्फान अजून नाही आली म्हणालेला, ह्याला कुठून मिळालं असेल.. आपल्या सिटीत तर ही नक्की नाही! ..sh##…काय राव…! “सर युवर ब्लू टूथ… डु यु नीड ऍनी हेल्प…” ..”नो आय एम फाईन..” पण हेडफोनस्…? डायरेक्ट चुरा..!!.. sh##! sh##! sh##!!” आजचा दिवसच घाण आहे यार..!” छे! किती वेळ राहिलाय.. 18Mins.. oh.. Adrenalin rush up!! आज असंच धावायचं म्हणजे.. विदाऊट Morning beats..! Fine! बोर होईल जरा.. पण ठीक आहे.. आज हवाही तशी बरीच आहे.. अगदी बारीकसा पाऊसही भुरभुरतोय वाटतं.. सही! आणि वारा आज असा आहे ना, की पाऊस नुसता भुरभुरून वरच्यावर उडून जातोय, बिलकूल भिजवत नाहीये मला, आणि तरीही छान गार वाटतंय. ओह! पुन्हा गेली माझी Mg Hector..! Redमधे कसली killer दिसते यार ही!! हा काय हिला विकत घेऊन टेस्ट ड्राईव्ह करतोय की काय! महानच म्हणायचं! जाऊदे त्याला, तो पुढचा राऊंड complete करायच्या आत मी हा ट्रॅक पळून येणार आहे. लेट्स रेस बेबी! ओह! आज दम जास्त लागतोय वाटतं.. किंवा आय एम नॉट डायव्हरटेड मे बी.. बरंय आज सायराच्या beats शिवाय माझ्या स्टॅमिनाचा खरा अंदाज येतोय खरं तर! ओह! हा पक्ष्यांचा थवासुद्धा आज मला मागे पाडणार काय.. नो वे! एवढा चढाव संपला की मग मीच ‘विनर’.. अँड येस्स…आय डीड ईट! अँड देअर गोज माय डार्लिंग Hector…!

वाह! मजा आगया! आज घराकडे परतताना देखील एकदम ताजंतवानं वाटतंय. रोज अशीच हवा पाहीजे नाही..? पहाटेच्या हलक्याशा उन्हात भुरुभुरू पावसाचा गारवा.. त्याचबरोबर आयुष्यात अशीच speed आणि स्वतःशीच चढाओढ कायम पाहीजे.. routine ऑफिससुद्धा एक आकर्षक adventure होऊन राहातं मग!

— प्रज्ञा वझे घारपुरे 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..