दिव्याची ज्योत पेटली,
वात दिसे जळताना ।
जळेना परि वात ती,
दिव्यांत तेल असताना ।।२।।
जळत असते तेल,
देऊनी प्रकाश सारा ।
आत्मबलीदानाचा दिसे,
शोभून तेथे पसारा ।।३।।
बागडे मूल आनंदी,
तिळा तिळाने वाढते ।
आई-बापाच्या मायेनी,
झाड कसे बहरते ।।४।।
कष्ट त्याग हे जळती,
सुगंध आणिती जीवनी ।
गर्भामधली ही चेतना,
जाणतील का कुणी ? ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply