खोलीमध्ये कोंडूनी मांजर, हाती घेई काठी ।
मारून टाकण्यासाठी तीला, लागला तो पाठी ।।
अतिशय भीत्री असूनी ती, जीवासाठी पळे ।
हतबल होता पळून जाण्या, मार्ग तो ना मिळे ।।
उपाय नसता हाती कांहीं, चमत्कार घडे ।
सर्व शक्तीनी त्याच्यावरती, तुटून ती पडे ।।
उडी मारूनी नरडे धरले, दोन्ही पंजानी ।
मृत्यूचाच तिने गळा घोटला, शक्ती युक्तींनी ।।
प्रत्येकामध्ये सुप्त असते, शक्ती लपलेली ।
अवचित वेळ पडता दिसे, बाहेर आलेली ।।
मदत देतो निसर्ग तुम्हां, संधी बचावासाठी ।
जीवनासाठी झगडत रहा, शिकवण ही त्याची ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
Leave a Reply