नवीन लेखन...

सुप्त शक्ती

खोलीमध्ये कोंडूनी मांजर,  हाती घेई काठी  ।

मारून टाकण्यासाठी तीला,  लागला तो पाठी  ।।

अतिशय भीत्री असूनी ती,  जीवासाठी पळे  ।

हतबल होता पळून जाण्या,  मार्ग तो ना मिळे  ।।

उपाय नसता हाती कांहीं,  चमत्कार घडे  ।

सर्व शक्तीनी त्याच्यावरती,  तुटून ती पडे  ।।

उडी मारूनी नरडे धरले,  दोन्ही पंजानी  ।

मृत्यूचाच तिने गळा घोटला, शक्ती युक्तींनी  ।।

प्रत्येकामध्ये सुप्त असते, शक्ती लपलेली  ।

अवचित वेळ पडता दिसे,  बाहेर आलेली  ।।

मदत देतो निसर्ग तुम्हां, संधी बचावासाठी  ।

जीवनासाठी झगडत रहा,  शिकवण ही त्याची  ।।

 

डॉ. भगवान नागापूरकर

संपर्क – ९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

 

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..