तुझ्या मुरलीचे सूर ऐकू दे रे.
गोविंद गोविंद हरे मुरारे..
आम्हावर रुसलास की कोपलास.
जाणवत आहे जीव होतोय कासावीस..
म्हणतात सारे. नको आता औषध वा दवा.
फक्त कामीच येईल तुझीच दुवा..
वनी खेळत होतास तू सवंगड्या समवेत.
आमची लेकरं मात्र ठेवलीस कोंडून घरात.
नंदलाल मिळू दे त्यांनाही बालपणाचा आनंद.
त्या साठीच तुझ्या बासरीचे सूर लागू दे धुंदमंद
मिळू दे सर्व लेकरांना मनमुराद दूध दही लोणी
वचिंत न राहू देत त्यापासून अगदीच कौणी..
होऊ देत सारी लेकरं खाऊन पिऊन धप्टपुष्ट
त्या शिवाय जाणार नाही तो राक्षस कोरोना दुष्ट..
धन्यवाद.
— सौ. कुमुद ढवळेकर.
Leave a Reply