सुरां – सुरांचे गीत व्हावे,
अर्थवाही शब्दातुनी,
भावनांची गोड पखरण,
मंजुळ तराणे नादातुनी,–!!!
काळजाचा ठांव घेत असे, स्वाभाविक त्या गानातुनी, आलापातुनी अगदी अल्लद ,
स्वर्गीय गान निर्मितसे,–!!!
शब्द होती जिवंत केवढे,
संगीत वाहते निर्झरापरी,
सुरेल बनत आरोह अवरोह,
अंतिम ते हृदयस्पर्शी गाणे,–;!!
सूर लागता भान हरपतसे
डोहातून त्या तरंग उठती ,
स्वरमयी ती विलक्षण थरथर,
अंतरातुनी अगदी पार जातसे,–!!!
ताल-नादांच्या विश्वामध्ये, सुखदुःखे मागेच पडती,
आनंदाचे अविरत निधान,
थेट आत्म्याशी संवाद साधे,–!!!
माना -पानाच्या कल्पनांचे,
बुडबुडे आत आत विरती,
अहमभावाचे मोठे अडसर,
गानकला धुळीस मिळवती,–!!!
जसे सापडती मार्ग सुरांचे,
असुरी* भावना नाहीशा होती, आपल्यासाठी उघडे स्वर्ग ,
समोर ते गंधर्वच गाती,–!!!
© हिमगौरी कर्वे.
Leave a Reply