पाकच्या उद्धमपणाला व खुमखुमीला भारताने अखेर थेट आणि उघड प्रत्युत्तर दिले आहे. आज सकाळी पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी मिराज-2000 लढाऊ विमानांनी सीमा रेषा ओलांडाऊन पाकव्याप्त काश्मीर मध्ये घुसून दहशतवादी तळांवर कारवाई केली. 12 मिराज विमानांनी 1000 किलो बॉम्बचा वर्षाव केला. यामध्ये अनेक दहशतवादी कॅम्प नष्ट झाले. पुलवामा हल्ल्याची जबाबदारी घेणाऱ्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तीन तळ या कारवाईत उद्ध्वस्त झाल्याची माहिती आहे. शिवाय इतर दहशतवादी संघटनानांही या एअर स्ट्राईकने जबर तडाखा ठेवून दिला. जवळपास २०० ते ३०० अतेरिकी या कारवाईत ठार झाले असल्याची माहिती आहे. पाक पुरस्कृत दहशतवादी हल्ल्याना भारतीय जनताच नव्हे तर भारतीय सेनादलही कंटाळले होते. मात्र राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी पाकिस्तनाची अरेरावी सर्वाना सहन करावी लागत होती. उरीच्या दहशतवादी हल्यानंतर भारतीय सैन्याने सर्जिकल स्ट्राईक केला. मात्र तरीही पाकचे वाकडे शेपूट सरळ झाले नाही. १४ फेब्रुवारीला पुलवामा दहशतवादी हल्ला पाकपुरस्कृत दहशतवाद्यांकडून करण्यात आला. जसा पापाचा घडा भरला कि तो फुटतो.. अगदी त्याचप्रमाणेच पाकच्या दुष्कृत्यांचाही कळस झाला.. राजनैतिक इच्छाशक्तीला लष्करी कारवाईची जोड मिळाली. अन, भारतीय वायुदलाने पाक पुरस्कृत दहशहतवाद्यांची नियोजनपूर्वक व सूत्रबद्धरीत्या ‘शस्त्रक्रिया’ करून पुलवामा हल्ल्याचा सव्याज बदला घेतला. मात्र, हा फक्त ‘बदला’ नाही तर या माध्यमातून भारताने संपूर्ण जगाला विशेषता पाकिस्तनाला एक संदेश दिला आहे. ‘ आम्ही युद्धखोर नाही, पण युद्धच करायचे असेल तर आता आम्ही तयार आहोत.’ .. कुरापत काढली तर त्याच भाषेत जबाब दिल्या जाईल.. भारताने मनावर घेतले तर भारताचे सैन्य कशाप्रकारे पाकची धूळधाण उडवू शकते, याच एक ट्रेलर भारतीय वायुदलाने दाखवून दिले आहे. यापुढे नीट राहा नाहीतर पूर्ण पिक्चर दाखवू , हा इशारा यातून पाकला देण्याला आलाय.
दहशतवादी हल्ला झाला कि केवळ निषेधाच रडगाणं गाणारा भारत असा काही पवित्रा घेईल असे पाकिस्तनाला स्वप्नातही वाटलं नसेल! त्यामुळेच त्याची आता धांदल उडाली आहे. भारताच्या कोणत्याही हल्ल्याला प्रतिउत्तर देण्यास पाकी लष्कर सज्ज असल्याच्या वलग्ना पाकचे लष्करप्रमुख करत असले तरी वायुदलाच्या नुसत्या ट्रेलरने पाकची भंबेरी उडाली आहे. अर्थात, भारताचा हल्ला परतवून लावल्याचा कांगावा पाक करत असला तरी भारतचे वायुदल पाकमध्ये घुसले तब्ब्ल अर्धा तास दहशतवादी तळावर बॉम्बवर्षाव करून परत आले. पक्की माहिती, उत्तम नियोजन, सफाईदार अंमलबजावणी याचा वायुदलाने घातलेला मेळ तर जगालाही तोंडात बोटे घालायला लावणारा आहे. निष्णात सर्जन ज्या पद्धतीने शस्त्रक्रिया करताना नेमक्या ठिकाणची सर्जरी करतो. त्याप्रमाणे अचूक ठिकाणी मारा करून वायुदलाच्या शूर सैनिकांनी दहशतवाद्यांचा खात्मा केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाकोट, चकोटी, मुझफ्फराबाद येथील जैशचे कॅम्प नष्ट करण्यात आले आहेत. बालाकोट पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वाह येथे आहे. हल्ला केलेले ठिकाणी एलओसीपासून 50 किलोमीटर अंतरावर आहे. पाकमध्ये घुसून इतकी गुंतागुंतीची आणि किचकट लषकरी कारवाई करणाऱ्या भारतीय वायुदलाच्या व त्यांच्या पराक्रमाचेच कौतुक केले पाहिजे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत वा कोणत्याही संकटाशी सामना करण्याकरिता नेहमी सज्ज असणाऱ्या भारतीय जवानांनाच या मोहिमेच्या यशस्वीतेचे श्रेय प्रामुख्याने द्यावे लागेल.
अर्थात या कारवाईनंतर पाकिस्तान हुशार होईल आणि आपल्या कुरापती बंद करेल असे समजणे चुकीचे ठरेल. कारण पाकिस्तानचे लष्कर पहिल्यापासून कुरापतीखोर आहे. राज्यकर्त्यांनाही ते फारशी किमंत देत नाही. आणि भारताला अतोनात त्रास देण्यासाठी इरेला पेटलेले असल्याने असे लष्कर स्वस्थ बसणे शक्य नाही. एखादी कुरापत त्यांच्याकडून उकरून काढली जाऊ शकते. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तनाला राजनीती आणि रणनीती या दोन्ही पातळ्यांवर घेरले. मोस्ट फेव्हर्ड नेशनचा दर्जा काढून घेत आणि पाणी अडविण्याचा निर्णय घेऊन भारताने राजनैतिक पातळीवर पाकच्या नाकातोंडात पाणी आणले. आणि आता लष्करी कारवाई करून पाकचे कंबरडे मोडले आहे. या परिस्थितीत बेभान झालेला पाक पलटवार करण्याची श्यक्यता नाकारता येत नाही. याचा अर्थ आपण नमते घ्यायचे असं मुळीच नाही. आपले लष्कर अशा चार पाकिस्तानला संपवायला समर्थ आहे. परंतु समोरून वार करणार्याची छाती चिरता येते मात्र माघून वार करणाऱ्याचा घाव रोखता येत नसतो. पाकिस्तान भारताशी समोरून युद्ध करण्याची श्यक्यता कमीच आहे. कारण त्याचे परिणाम त्याने तीन वेळा भोगले आहेत. त्यामुळे अशी चूक तो चौथ्यादा करेल असे वाटत नाही. आणि राहिला प्रश्न अणुयुद्धाचा तर या निव्वळ पोकळ गर्जना आहेत. पाकिस्तानची या धरतीवर शाबूत राहण्याची इच्छा संपल्यावरचते असा निर्णय घेऊ शकतील. पण एकदा दहशतवादी हल्ला होण्याची श्यक्यता नाकरता येणार नाही. त्यामुळे सरकारने,प्रशासनाने आणि सैन्याने दक्ष राहण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला धाडसाच्या आणि आत्मविश्वासाच्या वाटेवर नेले आहे. मध्यंतरी त्यांच्या 56 इंच छातीच्या वक्तव्यावर अनेक टीका झाल्या. परंतु संयम ढळू ने देता मोदींनी वेळ आल्यावर अनेकांना आपल्या छातीचे माप दाखवून दिले आहे. फक्त हि रणनीती यापुढेही कायम राहावी एवढीच अपेक्षा..!!
— अँड. हरिदास बाबुराव उंबरकर
Leave a Reply