अभिनेता सुशांत शेलार यांचा जन्म १७ नोव्हेंबर १९८० रोजी मुंबई येथे झाला. सुशांत शेलार हे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध नाव असून ते थिएटर, टीव्ही पण जोडलेले आहेत. मुंबईतून त्यांनी शालेय शिक्षण व महाविद्यालय केले. त्यांनी बालपणी अनेक नाटके व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला होता १९९१ साली बाल कलाकार म्हणून काम करणारी त्यांची कारकीर्द सुरू झाली.
मयूरपंख मध्ये बाल कलाकार म्हणून काम केले होते. महाविद्यालयीन दिवसांपासून ते आपल्या सांस्कृतिक कार्यात सक्रिय होते आणि आपल्या कारकीर्दीसाठी अनेक गोष्टी करीत आहेत. त्यांच्या काही नाटकांमध्ये मी नथुराम गोडसे बोलतोय, अयत्यावर कोयता, बहुरुपी पु. ल आणि आधी बसू मग बोलू यांचा समावेश आहे. सुशांत शेलार यांनी मराठी चित्रपटसृष्टीला अनेक चित्रपट दिले आहेत. त्याचा दुनियादारी हा चित्रपट प्रचंड हीट झाला होता. या चित्रपटातील त्याची प्रीतमची भूमिका प्रेक्षकांना खूपच भावली होती. त्याचबरोबर त्यांनी क्लासमेट, तू ही रे, धूम टू धमाल, मॅटर, ब्लाइड गेम, संघर्ष अशा अनेक चित्रपटात काम केले आहे.
सुशांत शेलार यांनी रूपेरी पडदयाबरोबरच आपल्या अभिनयाची चुणूक छोटया पडदयावरदेखील दाखविली आहे. त्यांनी या गोजिरवाण्या घरात, मयूरपंख, किमयागार, घे भरारी, काटा रूते कोणाला, इंद्रधनुष्य अशा अनेक मालिकादेखील केल्या आहेत. सुशांत शेलार हे एक चांगला कवी आहेत आणि त्यांनी कविता व इतर लेखन केले आहे. ते आपल्या वैयक्तिक जीवनात श्री स्वामी समर्थांचे भक्त आहेत. त्यांची समर्थ व्हिजन नावाची संस्था आहे.
सुशांत शेलार यांची ‘कबड्डी’ खेळाशी लहानपणापासून एक नाळ जोडली गेली आहे. या खेळाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने त्यांने या ‘कबड्डी’ सामन्यांचे आयोजन केले आहे. सुशांत शेलार यांचे वडील अरुण दत्तात्रय शेलार हे उत्तम कबड्डीपटू होते. त्यांच्या स्मरणार्थ ‘शेलार मामा फाऊंडेशन’च्या वतीने दर वर्षी सुशांत शेलार हे सामने भरवित असतात. सुशांत शेलार यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे आता सुशांतच्या चाहत्यांना तो एक नवीन जबाबदारी पार पाडताना दिसणार आहे. सुशांत शेलार हे शिवसेनेच्या चित्रपट सेना कार्याध्यक्ष आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply