जगभरातील तमाम छोट्या- मोठ्या गोष्टींकरता इंजेक्शन टोचणे हा उपाय नाही हे सर्वप्रथम आपण लक्षात घेतले पाहिजे. आयुर्वेदातील ‘सुवर्णप्राशन संस्कार’ हा हिंदुस्थानच्या ‘राष्ट्रीय लसीकरण’ मोहिमेचा भाग व्हायला हवा. आयुर्वेद हे या राष्ट्राचे पर्यायी नव्हे तर प्रमुख वैद्यकशास्त्र आहे. उत्तम रोगप्रतिकारक्षमता निर्माण करण्यासाठी आपल्याला आयुर्वेदाचाच आधार घ्यावा लागेल. ‘व्याधीक्षमत्व’ हा शब्द जगाला सर्वप्रथम शिकवला तो आयुर्वेदानेच!!
यासंबंधाने आयुर्वेदात काही संशोधने झाली आहेत का? हो; अलबत झाली आहेत. जामनगर ते त्रिवेंद्रम किंवा अगदी आमच्या गोव्याच्या महाविद्यालयातदेखील वैज्ञानिक मापदंड आणि सांख्यिकी यांच्या आधारे संशोधने झालेली आहेत. हजारो मुलांना आजवर सुवर्णप्राशनाचा प्रत्यक्ष लाभ झाला आहे. आमच्यासारखे कित्येक वैद्य आपापल्या चिकित्सालयातून ‘सुवर्णप्राशन संस्कार’ करत आहेतच. मात्र त्याची अंमलबजावणी शासकीय पातळीवर व्हावी असे वाटते. हे सहजशक्य आहे. इच्छाशक्ती मात्र हवी.
मोदीजी ती दाखवतील का?
© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५
Aug 23, 2016
Leave a Reply