आज सहज संध्याकाळी मळ्याच्या कडेने गेलो फिरायला .. 100 150 एकर चा भर ऊन्हाळ्यात हिरवागार असलेला ऊन्हाळीभाताचा -वायंगणीचा- मळा…… मन सहज 20 25 वर्ष मागे गेलं…..
मार्च एप्रिल महिन्यात पुर्ण मळा रिकामी व्हायचा… आणि आमची 7 8 गुराख्यांची टोऴी निघायची मळ्यात, 30 40 गुरे घेऊन… जेव्हा ईतरांच्या जनावरांना कोरडा चारा दुरास्पत असायचा… तेव्हा आमच्या जनावरांना हवा तेवढा हिरवा चारा…… मोकळी सोडलेली पुर्ण दिवस….
काय दिवसाचा अप्रतिम दिनक्रम होता…. सकाळी 7 ला दिवस उगवायचा आमचा…. 8. ला जनावरे सोडायचं काम… मोकळा वारा प्यायचा… तिथच एक बांधावर प्रचंड रायवळ आंबा होता.. 70 80 तरी आंबे गोळा करायचे… 10 10 तरी प्रत्तेकजण खायचा….
मग दोन तिन मेंबर फणसाच्या शोधात निघायचे. पिकलेले खायचे… तर कच्चे नदिच्या वाळुत पुरुन ठेवायचे… ऊद्याला…
एकदिवस चवळीच्या शेंगा भाजायच्या तरी दुसर्यादिवशी भुईमुगाच्या… कुणाच्याही…
11 वाजल्या नंतर सगळा लवाजमा नदिवर जायचा… मग 2 तास डुबणे नदित…. जनावरांची आंघोऴ… आणि ऱाखण्यांची पण… एकत्रच….
म्हैशीच्या कानात मासा पकडणे म्हणजे स्पेशालिटी…. अगदी थोड्यांकडेच….
मग घरी अडीजवाजता…. जेवण झालं की काजीनी खेऴायचं… मुकरीचा मांड खासच….
गल…. ढोपो…… जुगी….. सप….. फगाम….
हे शब्दच आता ऐकायला येत नाहीत. . किंवा हद्दपारच झालेत….
परत ऊन ऊतरलं की म्हशींसोबत मळ्याची वाट… पण आता क्रिकेट बॉल दिसायचा बंद होईस्तोवर क्रिकेट. त्यातही “कटीनी” खेळायचं म्हणजे खासच.. …….
मग खास बैठक चर्चा अगदि पंतप्रधानांपासुन बाजूच्या वाडीतील मंजिच्या लफड्यापर्यंत…
काऴोख पडल्यानंतर जनावरं चरवण्याची खास मालवणी स्टाईल…..
“म्हस कशी मेल्यासारखी एका जाग्यावर चरता”
मग जनावरं बांधायची….आणि जेवण झालं की अंगणात माटवात ऊघड्यावरच झोपायचं AC झकमारतो असा वारा आणि गारवा…. असा दिनक्रम अगदि मीरगाचो पावस… आणि चढणेचे मासे चढा पर्यंत….
बापुर्झा
डॉ. बापू भोगटे
Leave a Reply