रक्तातुनी गुण-दोष उतरतो, वंश परंपरेने
व्यक्तीतील स्वभाव धर्म, जाणता येतो रक्ताने…१,
मनांतील विचार मालिका, कृत्य करण्या लाविती
सभोवतालच्या परिस्थिती रूपे, रक्ताला जागविती…२,
कर्म फळाच्या लहरींना, रक्त शोषून घेई,
ह्याच गुणमिश्रीत रक्तामधूनी, बिजे उत्पन्न होई….३,
बिजांचे मग रोपण होवूनी, नव जीवन येते
स्वभाव गुणांची मालिका, अशीच पुढे जाते…४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply