चला तोडूया या कोषाला
मुक्त करूया सुरवंटाला
अंतरंगातुन घेऊ उर्मी
उडुदे स्वच्छन्द फुलपाखराला
होऊ सोबती मीच मजला
नकोशी गर्दी हवी कशाला
एकले आपण येती जाती
कशास क्षणिक कुणी धुंडाळा
ठेऊन साक्षी परमात्म्याला
सोड भार वाही चरणाला
पंखा कुठे रे चिंता उद्याची
घास चोची देई चाऱ्याला
नको गाठोडी भविष्याला
गाठ बसे, सुटेना जीवाला
तू मी सारे येरझारे प्रवासी
सुखे जगू दे या आत्म्याला!!
— वर्षा कदम.
Leave a Reply