उपनिषदातील अनुशासनात ज्या अनेक आज्ञा केल्या आहेत त्यातील एक आहे ‘स्वाध्यायान्मा प्रमदः म्हणजे स्वाध्यायात प्रमाद ‘होऊ नये. यथास्थित स्वाध्याय घडावा यासाठी काही व्रतांचे आचरणही त्यात आलेले आहे. ऋत स्वाध्याय प्रवचने, सत्यं स्वाध्याय प्रवचने – इत्यादी, थोडक्यात सदाचरण, सत्यनिष्ठा, संयमित जीवन इत्यादींनी स्वाध्याय संपन्न असावा. पण स्वाध्याय म्हणजे काय? मोक्षशास्त्राध्ययनं स्वाध्यायः किंवा आवृत्तिपूर्वक वेदाध्ययनम् स्वाध्यायः । ज्ञानेश्वर माउलींनी सर्वांना आकलन होईल या शब्दात स्वाध्यायाचा अर्थगतला आहे-तैसा प्रतिपाडुश्तो करणे।। अंधालात ठेवलेली एखादी जन्तु लागतो तसेच श्रुतीनी प्रतिपादन केलेला ईश्वर आत्मल्याने प्रत्यक्ष आहे याची प्रचीती यावी यासाठीचा अभ्यास म्हणजे स्वाध्याय – थोडक्यात ‘स्व’ चे अध्ययन व्हावे, आपले यथार्थ स्वरूप कळावे, यासाठी नित्य स्वाध्याय अपेक्षित आहे. या सम्यक्, ज्ञानासाठी अनासक्ती, पूर्वग्रहरहित दृष्टी आणि श्रद्धा आवश्यक आहे. त्यातून मी कोण आहे, याचे ज्ञान होईल. आरशात पाहून रूपाची ओळख होईल. स्वाध्यायाद्वारे आपल्या यथार्थ स्वरूपाचे ज्ञान होते. ‘माझे शरीर थकले, किंवा माझे मन उदास झाले आहे, इत्यादी वाक्यातून, ते उच्चारणारा शरीरापासून भिन्न असणारा असला पाहिजे, हे सहज कळते. हा देह, पंचप्राण, पंच कर्मेंद्रिये मन हे जीवाचे खरे स्वरूप नसून त्यापासून वेगळे आहे.
हा स्थूल देह गाढ निद्रेच्या आधीन असताना तो सुषुप्तिचा आनंद साठवणारा कोण आहे याचा सातत्याने शोध घ्यायचा आहे. शंकराचार्यांनी एका स्तोत्राचा या स्वरूपदर्शनाचा तपशील दिलेला आहे. मनोबुध्यहङकारचित्तानि नाहं। न च श्रोत्र जिव्हा न घ्राणनेत्रे न च व्योमभूमौ न तेजो न वायु । चिदानंदरूपं शिवोहं शिवोहं। मन, बुद्धी, अहंकार, चः देह, पंचमहाभूतात्मक ही इंद्रिये हे माझे स्वरूप नसून आनंदरूप असे माझे स्वरूप आहे. या स्वरूपाच्या प्रत्ययासाठी स्वाध्यायाची गरज असते. अंधारातील वस्तु सापडावी यासाठी दिव्याचा आधार घ्यायचा किंवा वृक्ष फळांनी संपन्न व्हावा यासाठी मूळांना पाणी द्यायचे .त्याप्रमाणे आत्मस्वरूपाच्या प्रत्ययासाठी श्रुतींचा, संतवचनांचा अभ्यास त्याचे चिंतन करायचे याचे नाव स्वाध्याय.
– वा.गो. चोरघडे
संकलन : शेखर आगासकर
Leave a Reply