स्वागत नववर्षाचे करत, सुखदुःखांच्या संकल्पना, आज नवीन दिन उगवला,
प्रार्थित अजोड नव- अरुणां,–!!!
कल्पना सुखाच्या करत,
दुःखांचे डोंगर मागे सोडा,
साजरा करत आनंद,
समर्थ होऊनी खडे रहा,–!!!
काय दडले काळाच्या पोटात,
तोंड उन -पावसा देण्यां,
सिद्ध असतो हरेक माणूस,
संकटावरती मात करण्यां,—!!!
काय शिकवी गतकाळ,
सुधाराव्यात आपल्या चुका, नियतीचे जे होती लक्ष्य,
त्यांना हात द्यावा नेमका,—!!!
कुरवाळतो आपण अहम्
बाजूला ठेवू या थोडा,
दृष्टी आपली संकुचित,
मोठा दृष्टिकोन ठेवावा,–!!!
माणुसकी आज दुर्लभ,
स्वस्त अस्वच्छतेच्या जागा,
परिसर काय, आपले मन,
लख्ख करत मोकळे जगा,–!!!
निसर्गराजाची नाही किंमत,
माणूस दाखवत स्वार्थ,
हेतू आपले सारे लपवत,
उगीच स्वीकारे परमार्था,—!!!
असती देव – वर्तमान भविष्य,
करू त्यांची यथासांग पूजा,
प्रेमास फक्त प्राधान्य देत,
मनुष्यजन्म नाहीच दुजा,–!!!
© हिमगौरी कर्वे.
Leave a Reply