नवीन लेखन...

स्वामी विवेकानंद विचारदर्शन

स्वामी विवेकानंदांनी भारतीय दर्शन आणि आध्यात्मिकतेच्या दिलेल्या संदेशाने सार्‍या विश्वाला दिव्य प्रकाश झोत दिला. “रोमा रोला” यांच्या शब्दात सांगायचे तर स्वामी विवेकानंद कधीही द्वितीय नव्हते तर ते सर्वदा अद्वितीय होते. नोव्हेंबर 1881 मध्ये स्वामी रामकृष्ण परमहंस यांची झालेली पहिली भेट म्हणजे एक आश्चर्यकारक प्रसंग होता त्या प्रसंगाने एका मोठ्या नागरिकाला जगातील सर्वश्रेष्ठ अस आस्तिक बनवले. 1883 च्या शिकॅगो विश्व संमेलनात स्वामीजी महापुरुष गणले. स्वामी विवेकानंदांनी जीवनात आध्यात्मिकतेला “राष्ट्राचा मेरुदंड” आणि “मानवतेची माता” म्हंटले आहे. स्वामी विवेकानंदांनी“आत्मज्ञान” हीच जीवनातील सर्वोच्च उपलब्धी मानली आहे. स्वामी विवेकानंदांनी पूर्णत: वर्गभेदाचा अस्वीकार केला आहे. त्यांनी केवळ मानवाच्या असतत्त्वामध्ये एकता -एकात्मता अनुभवली नाही तर पशू, पक्षी, वृक्ष रोपटी चर – अचर या सर्वांमध्ये एकत्व सांगितले आहे. उच्चतम अशा परमेश्वरापासून तो सर्वसामान्य व्यक्तिंमध्ये हे एकत्व त्यांनी पाहिले.

स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या सर्वच भाषणांमधून वीरता आणि साहसाचा भाव जागविला. त्यांनी एकत्व आणि भारतीयत्व जागवतांना म्हंटले आहे की, “तुम्ही मोठ्या स्वाभिमानाने म्हणा मी भारतवासी आहे, प्रत्येक भारतवासी माझा बंधू आहे, अज्ञान, दरिद्र भारतवासी माझा बंधू आहे”. कोणत्याही भेदभावाला थारा न देता उलट त्यांनी माणसाची हीच ईश्वराची पूजा आहे हे त्यांनी सांगितले.

स्वामी विवेकानंदांनी धर्माला “राष्ट्रीय आत्मा” म्हंटले, धर्माला राष्ट्राचा प्राण असे ही म्हंटले. प्रत्येक गोष्ट वस्तू धर्माच्या आध्यात्मातून आणली जाती. हिंदुधर्माला त्यांनी सर्वक्षेष्ठ धर्म मानला. धर्म आणि ज्ञान हे परस्परांना पुरक आहेत. ते “चैतन्यांचे विज्ञान” आहेत असे ही सांगितले. खर्‍या अर्थाने त्यांनी हिंदुधर्म हा मानव धर्मच आहे. हे दाखवून दिले. स्वामी विवेकानंदांनी राष्ट्रीयतेचा पुरस्कारकेला.आणि त्यासंदर्भात मार्गदर्शन केले. आक्रमण केलेली राष्ट्रे लयाला गेली असल्याची सोदाहरण रोम, स्पेन, युनान यांच्या उदाहरणांनी पटवून दिले. त्यांनी भारताला सदाचारी, नैतिकता परायण आणि धार्मिक राष्ट्र मानले आहे.

स्वामी विवेकानंदांनी आपल्या अनेक भाषणातून स्त्री जीवनाचा आरंभ आणि अखेर मातृत्वातच सांगितला आहे. स्वामी विवेकानंदांनी भारतीय समाजाचा खरा आधार “नारीची प्रतिष्ठा” मानली आहे. त्याच प्रमाणे आपली भारतीय कुटुंब पध्दती हा सवोच्च संस्कार मानला आहे. आपल्या महिलांची स्थिती, अवस्था हे राष्ट्राच्या प्रगतीचे लक्षण मानले आहे. आपल्या संस्कृतीची स्त्री ही संरक्षक आहे. खर्‍या संस्कृतिक उन्नतीचा आणि आपल्या आध्यात्मकतेच ते एक प्रतिक आहे असे ते आर्वजुन मांडतात.

स्वामी विवेकानंदांनी आपल्या अवघ्या 39 वर्षांच्या आयुष्यात सार्‍या जगाला मानवसेवा, विश्व बंधुत्व शांती स्वातंत्र्याचे चिंतन यांचा एक दिव्य संदेश दिला आहे. त्यांनी भारतातील आध्यात्मिकता आणि धर्माच्या जोरावर धार्मिक आणि सामाजिक पुर्नजागरण केले. त्यांनी आपल्या भारत देशच्या भावी पिढ्यांमध्ये देशभक्ती भाव, स्वाभिमान, आत्मविश्वास आणि आत्मगौरव जागविला.

स्वामी विवेकानंदापासून प्रेरणा घेऊन महर्षी योगी अरविंद, महात्मा गांधी, सुभाष चंद्र बोस, रविंद्रनाथ टागोर इ. महानव्यक्तिंनी भारतराष्ट्राचा मार्ग प्रशस्त केला. आज सुध्दा रामकृष्ण मिशन, अद्वैत आश्रम यासारख्या संघटना आणि संस्था स्वामी विवेकानंदांच्या दिव्य संदेशानुसार राष्ट्रबद्दलची देशभक्तिची भावना सुदृढ व बळकट करण्याच्या कामामध्ये मग्न आहेत. स्वामी विवेकानंदांचा विचारांचा कार्याचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून देहनिष्ठाबनून राष्ट्र जागरण आणि पुर्ननिर्माण कार्यात आपोल्या भारत देशातील नवयुवकांची पिढी स्वत:ला झोकून देईल असा विश्वास निर्माण झाला आहे. भारतीय समाजातील सगळ्या समस्यासाठी त्यांच्या निवारणासाठी स्वामी विवेकानंदाच्या उज्वल तेजस्वी विचारांच्या प्रकाशात वाटचाल करील असा विश्वास वाटतो. प्रा. रोलॉवू. यांनी स्वामी विवेकानंदांचा गौरव विश्वात्माच्या वाद्यवृंदान सादर केलेले उत्कृष्ट संगीत या मोठ्या अर्थपूर्ण शब्दात केला आहे)

(शिक्षण हे शीलवान, चारित्र्यवान माणसे घडविण्याचे साधन आहे. माणूस आपल्या पायावर उभा राहू शकेल अशाच शिक्षणाची आवश्यकता स्वामी विवेकानंदांनी सांगितली आहे. एकाग्रता ज्ञान भंडार उघडू शकणारी एकमेव गुरुकिल्ली आहे. हे ज्ञानप्राप्तीची इच्छा बाळगणार्‍यांनी ध्यानात ठेवावे. असे हे विवेकानंदाचे शिक्षण, चिंतन मुलभूत सखोल आहे.)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..