नवीन लेखन...

स्वामी विवेकानंद विचारदर्शन

मातृदेवो भव ।
पितृदेवो भव
But I say
दरिद्रदेवो भव ।
मूर्खदेवो भव ।।

” The poor the literate, the ignorant the afflicted led these be your god, know that service to these alone is the Highest religion.” असे स्वामी विवेकानंद म्हणतात. अशा असंख्य विचारांची समाजामध्ये पेरणी केलेल्या स्वामी विवेकानंदाचे जीवन लक्षवेधी आहे. नवयुवकांना आवाहन करताना स्वामीजी म्हणतात, “पहले देवता, जिसको हमे पूजना है. वह है हमारे देशवासी है, निर्भय चरित्र, धैर्य रखो, उत्साहीत हो, गर्व करो तुम एक भारतीय हो और गर्वसे उदघोष करो मै एक भारतीय हूँ. हर भारतीय मेरा भाई है, भारत मेरा जीवन है. भारत का भला मेरा भला है. मेरी दुर्बलता को दुर करो. मेरी कपुरुषता को दुर करो. और मुझे मनुष्य बना दो आओ सभी मिलकर परिश्रम करे. मेरे भाईयो, यह कोई सोने का समय नही है. हमारे कार्य पर, ही निर्भर है. उठो और जागो, और बैठावो अपने सनातन सिंहासनपर पुनरोत्थित, पुर्नजीवन पहले से अधिक गौरवशाली हमारी मातृभूमी सर्व प्रथम हमारे नौ जवान को शक्ति सम्पन्न हो. धर्म बाद मे आयेगा, शक्तीशाली बनो.”

मेरे युवक मित्रो हे होते युवकांना स्वामीजींचे आवाहन स्वामी विवेकानंदा सारख्या आपल्या पूर्वजांच्या स्मृतीने आपल्या जीवनामधील आत्मविस्मृतीचा अध:कार नाहीसा होतो. आपले जीवन खर्‍या ज्ञानाच्या प्रकाशअने उजळून निघते. आपल्याला एक दिव्यभव्य साक्षात्कार घडतो. आणि मग सामान्य माणूसही पराक्रमाला सिधआद होतो. असा हा जागृत समाज, ज्ञानी समाज मग विजयगौरव आणि समृध्दी प्राप्त करतो. तेवढ्यासाठी आज आपल्या या पूर्वजांचे चिंतन आपल्याला करावयाचे आहे. स्वामी विवेकानंद इ. स. 1884 मध्ये वयाच्या 21 व्या वर्षी कलकत्ता विद्यापीठातून पदवीधर झाले. पण तत्पूर्वी 1881 मध्येच परमेश्वराच्या भेटीच्या तळमळीतूनत्यांची रामकृष्णाशी भेट झाली. सद्गुरुस्पर्शाने साक्षात्कार झाला आणि रामकृष्णाचे स्वामी विवेकानंद हे एकनिष्ठ शिष्य बनले या सद्गुरुच्या नेतृत्वाने आणि सामर्थ्याने नरेंद्रनाथ पुढे ते जगविख्यात स्वामी विवेकानंद झाले.

शिकागो येथील धर्म परिषद संसदेत त्यांनी हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले. ते भाषण गाजले. पुढे वेदांताच्या प्रसारासाठी त्यांनी रामकृष्ण मठ आणि मिशनची स्थापना कली. या वेदांत व ज्ञानाला “व्यवहार्य वेदांत तत्वज्ञान” हीस्वामी विवकानंदांनी दिलेली महान देणगी होय. जुने वेदान्त्याचे जुना वेदांत सागणारांचे अद्वैत निवृत्तीप्रवण आणि तात्विक चर्चे पुरतेच होते. सचिदानंद बहम हेच अंतिम सत्य असून ते एकमेव अद्वितिय आहे. संपूर्ण जग हे ईश्वरमय आहे.

ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग हे सगळे योग पूरक आहेत. ते सुसंगत, सन्मार्ग आहेत. आपले द्येय, सुप्त दिव्यतेचे भव्य प्रगटीकरण आहे. या शिकवणुकीतून सुखी जीवनाचे दरवाजे सर्वांना खुले करण्याचा स्वामी विवेकानंदाचा प्रयत्न होता ते म्हणत, ” पश्चिम ही धनिकांच्या टाचेखाली चेंगरली असली तर पूर्व ही धर्म मार्तंडाच्या टाचेखाली चिरडली आहे. आता आपण धन आणि धर्म यात समतोल साधला पाहिजे. आपल्या आध्यात्म्याला भौतिकतेची जोड दिली तर खर्‍या अर्थाने आपली प्रगती होईल.ह्ण हे विचार जनमानसात रुजविण्यासाठी स्वामिजींनी संन्यास घेतला. धर्म समाज सुधारणेला आपले सारे जीवन वाहुन घेतले. त्यांचे तत्वज्ञान असे आहे की तेजोभंगाने कोणताही कार्यभाग सफल होत नसतो. तेवढ्यासाठी आपण स्वकीयांना सदैव उत्कर्षाची प्रेरणा घ्यावी. आत्मनिर्भरता कधीही करु नये. आपण जुन्या रुढीचे खोटे समर्थन करु नये. असल्या भोळसट पणापेक्षा मग तुम्ही नास्तिक झालात तरी चालेल. आपण आत्मसात करित असलेल्या नवनव्या शास्त्राचा असा हा गैर उपयोग होऊ नये. अशी ही नव्या अर्थाने स्वामी विवेकानंदाना धर्मशांती अपेक्षित होती.

(श्रेष्ठ हिंदुधर्माच्या हिंदुत्वाचा आपण कधीही विसर पडू न देता जनतेलाच परमेश्वर मानून सदोदित सत्कार्य केले पाहिजे. आपले खरे भवितव्य हे जनतेवरच अवलंबून आहे. हे सगळे तत्वज्ञान स्वामी विवेकानंदांनी इ.स. १८९२ मध्ये म्हणजे वयाच्या २८ व्या वर्षी सांगितले. दिनांक २५ डिसेंबर ते २७ डिसेंबर असे फक्त तीन दिवस कन्याकुमारी येथे केलेल्या तपश्चर्येनंतर ते त्यांना उलगडले होते. खर्‍या अर्थाने या तीन दिवसाच्या तपसाधनेत त्यांना जीवन ध्येय गवसले होते. ही तपश्चर्या त्यांनी तीन सागरांनी वेष्टीत अशा श्रीपाद शीलेवर केली होती. त्या तिथेच आता भव्य विवेकानंद स्मारक उभे राहिले)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..