नवीन लेखन...

स्वप्नांचा पाठलाग..

डोळ्यात स्वप्नं असलेली माणसं, खिशात पैसे असलेल्या माणसापेक्षा जास्त श्रीमंत असतात..

आज प्रत्येकजण स्वप्नांच्या मागेे धावतोय. स्वप्नं, इच्छा, अपेक्षा इ. ची न संपणारी यादी..! आपण इतकं धावतो, इतकं धावतो की आजूबाजूला पहातचं नाही. स्वप्नांच्या मागे धावताना येणारा प्रत्येक दिवस मागे सरत जातो. या प्रत्येक दिवसागणिक आठवणीही मागे पडतात. त्या आठवणी मनातून कधीही पुसल्या जात नाहीत (कडू असो की गोड). एक स्वप्न पूर्ण झालं की, दुसर्‍या स्वप्नांच्या मागे आपण धावत सुटतो. यालाच म्हणतात का आयुष्य..?
 
आयुष्य हे न उलगडणारं कोडं आहे. खरंतर, सत्य परिस्थिती चे प्रखर ऊन जेव्हा स्वप्नातून जागवते तेव्हा स्वप्नांच्या मागे धावणाऱ्या लाखों लोकांना खरी जाग येते आणि स्वप्नांची ती रात्र कधीच सापडत नाही. कधी कधी ती कायमची हरवून जाते. आपण कितीही स्वप्नं पाहिले तरी ते पूर्ण होतीलच असे नाही. ते पूर्ण झाले नाहीत म्हणून जगणं सोडायच का? या प्रश्‍नाचे उत्तर नाही, असेच येणे अपेक्षित असते. तसे लोकांचं मन राखण्यासाठी आपण स्वप्नांच्यामागे धावत नसल्याचे भासवत असतो. परंतु, वास्तविक पहाता स्वप्नामागे धावणे सोडत नाही. या स्थितीतून प्रत्येकजण कधी ना कधी मार्गस्थ होतोच.
 
प्रत्येकाच्या गरजा, इच्छा, आकांक्षा वेगवेगळ्या..! पैसा साठवणं हे अंतिम ध्येय नसून आपल्याला हवी ती गोष्ट करण्याचं स्वातंत्र्य मिळवणं हे आहे. आपण निवडलेला मार्ग हा आपल्याला योग्य वाटलेला मार्ग आहे, प्रत्येकाला तोच पटेल असं नाही. आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, हे ज्याचं त्यानं स्वत:च ठरवायचं आहे. नियोजनबद्ध परिश्रम, सातत्य आणि चिकाटी अंगीकारून आत्मनिर्भरपणे स्वप्नांचा पाठलाग केला पाहिजे. केवळ स्वप्न पाहू नयेत, आणि स्वप्नातही राहू नये. प्रयत्नांशिवाय यश नाही. यशाची शिखरं चढतांना अनेकजण शिड्या होऊन, कधी मदतनीस होऊन, कधी कर्तव्य, कधी सेवा देऊन हातभार लावत असतात. ह्या सगळ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. तरच यश हे खरं यश असतं.
 
शेवटी, स्वप्नांचा पाठलाग करत आयुष्यात पाहिलेले स्वप्नं.. मनमुराद आणि भरभरून जगण्याची मजाच काही और असते… पण स्वप्नांचा पाठलाग करत तोच यशस्वी होतो, जो प्रत्येक पाऊलावर आपल्या माणसांना न विसरता त्यांना सोबत घेऊन चालत असतो…!!
 
स्वप्नांचा पाठलाग..
©Shyam’s Blog

Avatar
About Shyam Thackare 17 Articles
एक वाचक, एक श्रोता आणि रोजच्या जीवनातून जे अनुभव गाठीशी येतील ते अलगद कागदावर उमटवणारा मी...आणि काही आठवणी, काही अनुभव, काही मतं… लेखणीद्वारे मांडण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न…!
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..