नवीन लेखन...

स्वराधिराज !

 
पंडित भीमसेन जोशी यांच्या निधनाची बातमी येताच संगीतसूर्य अस्ताला गेल्याची भावना निर्माण झाली. आजच्या युगात पंडितजींसारखा गायक होणे अवघडच. त्यांची तपश्चर्या, गुरूपूजा, शास्त्रीय संगीतासाठी घेतलेली कडवी मेहनत हे सारं शब्दातीत ठरावं. इतर अनेक अव्वल पुरस्कारांबरोबरच त्यांना ‘भारतरत्नानेही गौरवण्यात आलं. त्यांच्या निधनाची बातमी येताच सहवासातील अनेक आठवणींना उजाळा

मिळाला.स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांच्या निधनाची बातमी ऐकली आणि मन सुन्न झालं. संगीतक्षेत्रात अतुलनीय कामगिरी गाजवणार्‍या या स्वराधिराजाला आज अवघा देश श्रद्धांजली वाहत आहे. या प्रसंगी त्यांची देदीप्यमान कारकीर्द डोळ्या समोरतरळते. त्यांच्या कामगिरीमुळे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा खर्‍या अर्थाने गौरव झाला. पंडितजींनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतालाएका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. त्यांच्या अव्वल गायकीला आज देश मुकला आहे. पंडितजींचं गाणं, त्यांची तपश्चर्या, संगीताप्रती असणारी निष्ठा, अवघ्या संगीत क्षेत्राला त्यांनी दिलेलं योगदान या सर्वच गोष्टी दंतकथा वाटाव्यात अशा आहेत.यापुढील काळात पंडित भीमसेन जोशी यांच्या सारखा गायक होणे नाही. त्यांची तपश्चर्या आणि गुरुपूजा याला तोड नाही. पंडितजींच्या गायनाला कशाची उपमा द्यावी हेच कळत नाही. आकाशात तळपणार्‍या सूर्याच्या तेजाची तुलना कोणाशीही करता येत नाही त्याचप्रमाणे पंडितजींच्या गायनाची तुलना कोणत्याही गोष्टींशी करता येणार नाही. त्यांची गुरुनिष्ठा, गाण्यासाठी घेतलेले परिश्रमया विषयी मी बरंच वाचलं, ऐकलं होतं. पंडितजींना प्रत्यक्ष भेटल्यावर, त्यांचं गाणं ऐकल्यावर या सार्‍याची प्रचिती आली. अत्यंत साधी राहणी आणि प्रत्येकाशी सौजन्यपूर्ण वर्तन हे पंडितजींचे गुणविशेष होते. गायक म्हणून ते जेवढे थोर ते ढ
ीच माणूस म्हणून त्यांची थोरवी शब्दातीत. हे मोठेपण वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडतात. पंडितजींच्या गाण्याबद्दल बोलताना जसं शब्दांचं थीटेपण जाणवतं तसेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे गुणविशेष सांगतानाही शब्दांचं अपुरेपण लक्षात येतं.पंडितजींच्या सहवासातील अनेक आठवणी आज माझ्या मनात रुंजी घालत आहेत. इंदूरच्या आमच्या घरी ते नेहमी येत असत. अर्थात त्यावेळी मी लहान होतो. पण, पंडितजींचं आमच्या घरी येणं, वडिलांशी गप्पा मारणं आणि मैफल रंगवणं हे सारंचांगलंच आठवतं. माझे वडिल रामूभय्या दाते हे रसिकाग्रणी होते. कोणताही कलाकार जाहीर कार्यक्रमासाठी इंदूरला आला आणि आमच्या घरी आला नाही, असं होत नसे. त्यामुळे प्रत्येक कलाकाराची शहरामध्ये जाहीर मैफल आणि आमच्या घरची खासगी मैफलठरलेली असे. नेहमी घरी येणार्‍या कलावंतांमध्ये कुमार गंधर्व आणि पंडित भीमसेन जोशी यांचा समावेश होता. पुढे मीहीगायनाच्या क्षेत्रात आलो आणि पंडितजींच्या भेटींना अधिक रंगत येऊ लागली. मी पुण्यात आल्यावर पंडितजींना नेहमी भेटत असे. आमच्या पिढीची पुण्याई थोर म्हणून पंडितजीं सारख्या गायकाच्या मैफिली ऐकण्याचं भाग्य लाभलं. त्यातही वडिलांच्या रसिकतेमुळे मला वेगवेवगळ्या कलावंतांची गाणी ऐकण्याची संधी मिळाली. या सर्व कलावंतांमध्ये पंडित भीमसेन जोशी यांचं नाव लखलखत्या हिर्‍यासारखं आहे. पंडितजींना कधीही भेटलो की ते माझ्या वडिलांच्या आठवणींमध्ये रमत. वडिलांच्या रसिकतेचं कौतुक करून त्यांच्या सहवासातील एकेक क्षणांना उजाळा देत. ते आमच्या इंदूरच्या घरी आले की गप्पांना कसा रंग चढत असे, गाण्याला माझे वडिल कसे दाद देत असत या सारख्या गोष्टी ते रंगवून सांगत.किराणा घराण्याचा वारसा लाभलेल्या पंडितजींनी वयाच्या 19 व्या वर्षी पहिल्यांदा सार्वजनिक गायन केलं. ताना आणि विशिष्ट पद्धतीन आ
ाज लावण्याची पद्धत हे किराणा घराण्याचं वैशिष्ट्य आहे. प्रत्येक घराण्याची वेगवेगळी वैशिष्ट्यं आहेत. ख्याल गायनात पंडितजींनी केलेल्या कामगिरीला तोड नाही. मुळातच ख्याल गायकी अत्यंत अवघड आणि दुर्मीळ असते. त्यासाठी प्रचंड मेहनत, अथक परिश्रम, अविरत रियाज आणि गाण्यावर प्रचंड निष्ठा अशा अनेक गोष्टींची आवश्यकता असते. पंडितजींनी आपलं सारं आयुष्य गाण्यासाठी समर्पित केलं. त्यांनी लहान वयातच शास्त्रीय गायनासाठी प्रचंड मेहनत सुरू केली. या क्षेत्रात दिगंत किर्ती मिळवल्या नंतरही त्यांच्या सांगितिक परिश्रमामध्ये थोडीही कमतरता जाणवली नाही. अशी निष्ठा, इतकी प्रचंड मेहनत असल्यामुळेच या क्षेत्रात पंडितजी ही कामगिरी करू शकले. ख्याल गायकीसाठी बुलंद आवाजाची आणि कडव्या मेहनतीची आवश्यकता असते. पंडितजींसारखा बुलंद आवाज प्रत्येक कलावंताला नसतो. एखाद्या गायकाचं गाणं सुंदर असू शकतं, त्याला तो आपल्या शैलीने नटवू शकतो पण पंडितजींसारखा आवाज असेल तर वेगळीच नजाकत प्राप्त होते. पंडितजींनी हे सारं अथक परिश्रमाने प्राप्त केलं. त्यांची गुरूनिष्ठा वाखाणण्यासारखी होती. गुरू म्हणजे देव असं पंडितजी नेहमी मानत आले. परमेश्वराची आराधना जेवढ्या तळमळीने करावी तेवढ्याच उत्कटपणे पंडितजींनी गुरूपूजा केली. आज या टप्प्यावर असताना त्यांच्या मनातील गुरुविषयीची श्रद्धा आणि निष्ठा कायम आहे. या निष्ठेतूनच त्यांनी सवाई गंधर्व महोत्सव सुरू केला. एक वेळ असा महोत्सव सुरू करणं शक्य असतं पण इतका प्रदीर्घ काळ अव्याहत सुरू ठेवणं हे मोठं कष्टाचं आणि जिकिरीचं काम असतं. पंडितजींनी गेली अनेक वर्षे हा महोत्सव सुरू ठेवला. संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी या महोत्सवात आपली कला सादर केली. या महोत्सवात कला सादर करण्याची संधी मिळणं हा संगीत क्षेत्रातील सन्मान समजला जातो. गेली अ ेक
र्षे हा महोत्सव अखंड सुरू आहे. दर वर्षी त्याची भव्यता वाढते आहे. या महोत्सवाच्या व्यासपीठावर प्रथम संधी मिळाल्यामुळे आजचे

अनेक नामवंत कलाकार प्रकाशात आले. 15-20 हजार संगीतप्रेमींची उपस्थिती असलेल्या महोत्सवाचे पंडितजी हे सर्वेसर्वा आहेत. आंतरराष्ट्रीय ख्याती लाभलेल्या या महोत्सवात पंडितजींनी स्वयंसेवकाची कामही मोठ्या श्रद्धेने केली. तरुण आणि ज्येष्ठ कलाकारांना प्रोत्साहन देताना त्यांची वाद्ये लावून देण्यातही पंडितजींनी कमीपणा मानला नाही. तीन रात्र जागरण केल्यानंतरही महोत्सवाच्या सांगतेसाठी पंडितजी रंगमंचावर यायचे तेव्हा हजारो रसिक भान हरपून पंडितजींचे स्वर कानात साठवून ठेवायचे.परदेशात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत सादर करणारे पंडित भीमसेन जोशी हे पहिलेच भारतीय म्हणावे लागतील. इंग्लंड-अमेरिके बरोबरच

नेपाळ, जर्मनी, स्वीडन, फ्रान्स यासारख्याया देशांमध्ये त्यांनी असंख्य मैफिली गाजवल्या. पंडितजींनी ललित, भटियार यासारख्या रागांची निर्मिती केली. पुरिया, ललत, तोडी, दरबारी कानडा, यमन, शुद्ध कल्याण, मारुबिहाग असे प्रचलीत राग पंडितजींनी अनेक वेळा गायले. पण प्रत्येक वेळी राग सादर करताना नवे काही तरी ऐकण्याचा आनंद श्रोत्यांनी घेतला. भारदस्त धीरगंभीर आवाज, तानांचा गडगडाट हे पंडितजींच्या गायनाचं वैशिष्ट्य. याचबरोबर ठुमरीचे कोमल, मादक स्वरही ते मोठ्या लिलया लावतात. रागदारी, ठुमरी, भजन, नाट्यगीत, अभंग असे अनेक गायनप्रकार गाऊन पंडितजींनी श्रोत्यांना स्वरवर्षावात चिंब न्हाऊ घातलं. स्वरवर्षावाची अशी दैवी देणगी लाभलेल्या पंडितजींना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्यामुळे त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान झालाच पण, भारतरत्न पुरस्कारालाही एक वेगळी झळाळी प्राप्त झाली.भक्तीसंगीत आणि चित्रपटसंगीतशास्त्रीय गायनाबरोबर पंडितजींचे मराठी अभंगही गाजले. माझे माहेर पंढरी, इंद्रायणी काठी अशा विठ्ठलाच्या अभंगांनी मराठी रसिकांशी त्यांचे अतूट नाते न र्
ाण झाले. मराठीबरोबरच त्यांनी हिंदी आणि कन्नड भाषेतही भजने गायली. त्यांच्या दासवाणी आणि एन्नापलीसो या कन्नड तर संतवाणी ही मराठी या ध्वनीफिती खूप गाजल्या. 1985 मध्ये देशभर लोकप्रिय झालेल्या ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ या व्हिडिओसाठी त्यांनी गायन केले होते. पंडितजींनी चित्रपटांसाठीही गायन केले. त्यात ‘बसंत बहार’ (1956) या चित्रपटात मन्ना डे यांच्याबरोबर, ‘बिरबल माय ब्रदर’ (1973) या चित्रपटात पंडित जसराज यांच्याबरोबर याशिवाय ‘तानसेन’ (1958), ‘अनकही’ (1985) या चित्रपटांसाठी गायन केले. ‘गुळाचा गणपती’ या चित्रपटातले त्यांचे ‘इंद्रायणी काठी’ हे गाणेही बरेच गाजले. या चित्रपटाला दस्तुरखुद्द पु.ल. देशपांडे यांनी संगीत दिले होते.

(अद्वैत फीचर्स)

— अरुण दाते, ज्येष्ठ भावगीत गायक

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..