नवीन लेखन...

स्वत:चा आदर्श

एकेकाळी अल कपोन नावाचा एक माफिया किंग शिकागोवर राज्य करत होता. वेश्या व्यवसायापासून खून गुन्हेगारीपर्यंत त्याचे साम्राज्य पसरले होते. कायदाही त्याला काही करु शकत नव्हता.

त्याचे कारण होते त्याचा जगत् विख्यात वकील. त्याला इझी एडी म्हणत असत. एडी आपल्या कामात इतका चतुर होता की त्याने अल कपोनला अनेक वर्षे तुरुंगात जाण्यापासून वाचविलेले असते.

बदल्यात कपोनने त्याला बरेच काही दिलेले असते. तो त्याच्यावर संपत्ती तर लुटतोच परंतु इतरही अनेक गोष्टी तो एडीला देतो. एडीला तो एक महालासारखा व्हिलाही देतो. त्यात नोकरा चाकरांपासून सर्व सोयी असतात. एडी मागेल ते त्याच्या समोर अल कपोन हजर करत रहातो.

एडी जरी अशा गुन्हेगारीच्या साम्राज्याबरोबर गुंतलेला असतो तरी तो त्याच्या मुलाला चांगली मूल्ये द्यायचा प्रयत्न करत असतो. चांगले काय, वाईट काय हे शिकवायचा प्रयत्न करत असतो. अर्थात तो आपल्या मुलासमोर स्वतःचे चांगले नाव अथवा आदर्श ठेवू शकत नसतो. त्याचे शल्य त्याला सतत बोचत असते.

एक दिवस एडी ठरवितो की आता बास झाले. आपण सरकारला सगळे खरे सांगू टाकले पाहिजे. आपण ही अपराधी भावना घेऊन जगू शकणार नाही. अखेर हिंमत करुन तो कोर्टात अल कपोनच्या विरोधात साक्ष देतो. त्याचे सगळे काळे धंदे उघड करतो.

त्यानंतर एक वर्षाच्या आतच एडी एका शूट आऊटमध्ये मारला जातो. मरताना त्याला एवढेच समाधान असते की त्याला आपल्या मुलासमोर स्वतःचा आदर्श निर्माण करता आला.

दुसऱ्या जागतिक महायुध्दात अनेकजण उत्तम कामगिरी करुन गेले. त्यातलाच एक होता बुच ओ हेर. तो फायटर पायलट होता. पॅसिफिक महासागराच्या उत्तरेला त्याची कामगिरी होती. एक दिवस त्याच्या अख्या स्क्वॉड्रनला कामगिरीवर पाठविण्यात आले. घाईघाईत हा ही निघाला. थोडे अंतर गेल्यावर त्याच्या लक्षात आले की त्याच्याजवळ फ्युयेल कमी होते. निघताना तो फ्युयेल घ्यायला विसरला होता. तेवढ्या तेलावर त्याला आपली कामगिरी पूर्ण करता आली नसती. तो परत जायला निघाला. त्याला त्याच्या मदर शिपवर जायचे होते. त्याने वरुन बघितले तर जपानी विमानांची एक मोठी फौज त्याच्या जहाजाच्या दिशेने निघालेली त्याला दिसते. अर्थातच त्यांना ते जहाज नष्ट करायचे असते. काय करावे ते बुच ओ हेरला कळत नाही.

हरायचे नाही असा निश्चय करुन तो जपानी विमानांची फॉर्मेशन तोडायला सुरुवात करतो. खूप प्रयत्न करुन तो जपानी विमानांना एवढे हैराण करतो की जपानी विमाने कंटाळून दुसऱ्या बाजूला निघून जातात. एवढ्या वेळात बुच ओ हेरने पाच जपानी विमाने नष्ट केलेली असतात.

आपल्या मोडक्या तोडक्या विमानाला घेऊन तो कसा बसा मदर शिपवर पोहोचतो. तो सर्वांना घडलेली हकीकत सांगतो. शिपवर असलेल्या गन कॅमेराने त्याचे सर्व काम टिपलेच असते. या बहादुरीबद्दल बुच ओ हेरला महायुध्दातले मेडल मिळते हे वेगळे सांगायला नकोच. त्याच्या नावाचा एअरपोर्ट सुध्दा अमेरिकेत आहे.

आता तुम्ही म्हणाल की या दोन गोष्टीत काय साम्य आहे? ओ हेर हा एडीचा मुलगा होता. मरता मरता एडी त्याला उत्तम चारित्र्य देऊन गेला होता.

— नीला सत्यनारायण

अनघा प्रकाशनच्या मैत्र या लेखसंग्रहातील हा लेख. हे पुस्तक मार्च २०१७ मध्ये प्रकाशित झाले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..