क ला उकार लावला तर कु होतो, मग अ ला उकार लावला तर अु का होऊ नये? क ला इकार लावला तर तर िक होते, मग अ ला इकार लावला तर िअ का होऊ नये. तसेच अू, अि, अे आिण अै ही अक्षरेही आपण स्वीकारली पािहजेत. िअंग्रजीच्या
आक्रमणानंतर, मराठी स्वरमालेत अॅ आिण ऑ या स्वरांची भर घालण्याची आवश्यकता भासली. कारण ब्रिटश राजवटीत ऑगस्ट, ऑक्टोबर, कॅम्प, कॅप, ऑिफस, बँक, कॅप्टन वगैरे शब्दांच्या अुच्चाराची सोय करणे अपिरहार्य होते. चंद्रचिन्ह वारून हा अुच्चार लिहीण्याची कल्पना ज्या कोण्या व्यक्तीने रूढ केली, तिच्या प्रितभेचे खरोखर कौतुकच केले पािहजे. नाही तर हे शब्द आगस्ट, आक्टोबर, क्यांप, क्याप, ब्यांक, क्याप्टन असे िलहावे लागले असते. आणि पूर्वी ते लिहलेही गेले आहेत. हिंदीत कैम्प, कैप, बैंक असे लिहीले जातात.
काही जुने संकेत मोडून, तारिर्कक द्रुष्ट्या बरोबर असलेले संकेत का स्वीकारू नयेत.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ही अ ची बाराखडी १९३० च्याही आधी सुचिवली. संगणकावर ही बाराखडी फार सोयीस्कर आहे. उ, ऊ, इ. ई, ए आणि ऐ या कळा दुसर्या कोणत्यातरी अक्षरांसाठी वापरता येतील.
म्हणूच, आपणा सर्व मराठी प्रेमींना अशी नम्र विनंती कराविशी वाटते की, अ ची ही बाराखडी, आपल्या रोजच्या लिखाणातही आपण न चुकता वापरावी.
गजानन वामनाचार्य, १८०/४९३१ पंतनगर, घाटकोपर (पूर्व). मंबअी ४०००७५.
०२२-२५०१२८९७, ९८१९३४१८४१.
बुधवार, २३ फेब्रुवारी २०११.
— गजानन वामनाचार्य
Leave a Reply