२३ फेब्रुवारी हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे पुतणे विक्रम सावरकर यांचा स्मृतीदिन.यांचा जन्म दि. २ डिसेंबर रोजी झाला.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कट्टर अनुयायी, सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे संस्थापक, हिंदूमहासभेचे ज्येष्ठ नेते, ‘प्रज्वलंत’चे संपादक अशी विक्रम सावरकर यांची ओळख होती.
सावरकरांचे पुतणे एवढंच काही विक्रमरावांचं कर्तृत्त्व मर्यादित नव्हतं. स्वातंत्रवीर सावरकर यांचे कनिष्ठ बंधू नारायणराव सावरकर यांचे सुपुत्र असलेल्या विक्रम यांनी सुरुवातीपासून हिंदू महासभेसाठी स्वतःला वाहून घेतले होते. विक्रम सावरकर यांनी त्यांचे संपूर्ण जीवन हिंदूमहासभेसाठी आणि हिंदुत्वाचा प्रसार करण्यासाठी व्यतित केले. हिंदूसंघटना बांधण्याबरोबरच समान नागरी कायदा, हिंदूंचे रक्षण, सिमला कराराला विरोध यासाठी त्यांनी लढा दिला होता.
मुंबई महापालिकेत वंदे मातरम् हे देशभक्तीपर गीत गायले जावे यासाठी त्यांनी मोर्चा काढला होता. त्यामुळे त्यांना शिक्षाही भोगावी लागली. भिवंडी येथील मुस्लिमबहुल भागात शिवजयंती मिरवणूक निघावी, मलंग गडावरील बंदी दूर व्हावी यासाठीही त्यांनी आंदोलने केली होती.ठाणे येथे सैनिकी शाळा सुरू करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. प्रकृती साथ देत नसतानाही ते सावरकरांच्या विचारांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी शेवटपर्यत कार्यरत राहिले. आजारपणामुळे सार्वजनिक आणि सामाजिक जीवनातून निवृत्ती घेतल्यानंतर शेवटचे त्यांचे वास्तव्य मुरबाड येथील मिलिटरी स्कूलमध्ये होते.विक्रम सावरकर यांचे २३ फेब्रुवारी २०१४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply