बाह्य जगीं प्रभूसी शोधतो,
विसरे जेव्हा ‘ अहं ब्रह्मास्मि ‘
कांही काळची विस्मृती ही,
ईश्वर चिंतनाच्या येई कामी…१,
शरिर जेव्हां रोगी बनते,
सुदृढतेची येई आठवण
प्रकाशाचे महत्त्व वाटते,
बघूनी अंध:कार भयाण…२,
चालना देयी विस्मरण ते,
शोध घेण्या त्याच शक्तीचे
उकलन होते मग प्रभूची,
स्मरण होता अंतर्यामीचे…३
– डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply