आज दीड वर्षे दोघे एकत्र घरात आहेत
वर्क फ्रॉम होम …पगार मिळत आहे..
सर्व काही आलबेल आहे ..बाहेच्याला वाटेल..
पण दोघे कमालीचे अस्वस्थ ..
दोघांचेही मोबाईल..एकदम भारीच..
पण मध्ये येत होता ‘ पासवर्ड ‘
जगण्याचा ‘ पासवर्ड ‘ दोघानांही अज्ञात
का तर स्पेंस ,जपणे , प्रायव्हसी जपणे .
एकमेकांचे लग्न होऊन चार वर्षे झाले..
मुलबाळ होऊ दिले नाही ?
कोण सांभाळणार ?
आता तर सतत एकत्र घरात ..
एकमेकांची ताकद…मर्यादा ..
सगळ्या एकमेकांना समजल्या ..
अर्थात नको तेवढ्या ..
मग फोन वर कोण कुणाशी चॅट करते ..
याकडे एकमेकांच्या मनाचे ..एकमेकांवर लक्ष ..
मग होणारी अज्ञात चिडचिड..
खूप काही घडत होते ….
एक दिवस एकमेकांनी कबूल केल्या
त्यांच्या मर्यादा अत्यंत उघडपणे..
अर्थात त्याला आपण भांडण म्हणू शकतो ..
मतभेद म्हणूं शकतो ?
खरे तर त्यांना लग्नाचा अर्थच कळला
नव्हता ..आपण बघतो ..
एकदा डिव्होर्स झाला …दोनदा झाला..
त्यांना हे कळत नाही
नवरा आणि बायको एकमेकांसाठी
‘ स्वीट डिश ‘ नसते…
तर ते एक परिपूर्ण अन्न असते ..
एकमेकांसाठी ..
कदाचित त्यांनाही कळेल पुढे ..
फक्त उशीर न होणे महत्वाचे ..
काय म्हणता खरे आहे ना ?
— सतीश चाफेकर.
Leave a Reply