ऑस्ट्रेलिया! हे नाव घेताच या देशात जाणार्यांची इच्छाशक्ति पुन्हा जागृत झाली नाही तर आश्चर्य. असेही तंत्रज्ञान इतकं प्रगत झालं आहे की एका क्लिकवर आपण सहज जगाची सफर करु शकतो पण अशातही ज्या गोष्टींची प्रत्यक्षात मजा लुटायची असते ती त्या ठिकाणी जाऊनच. मग ती खाद्यसंस्कृती असो किंवा एखादी वैशिष्ट्यपूर्ण जागा. ऑस्ट्रेलिया देशातल्या सिडनी शहरात असलेले “सिडनी ऑपेरा हाऊस” हेे त्यापैकीच एक.
इतिहास :
१ मार्च १९५९ रोजी पाया खणून बांधकामास सुरुवात करण्यात आले. १९७३ साली त्याचंं बांधकाम पूर्णत्वास गेलं. २० ऑक्टोबर १९७३ रोजी सिडनी ऑपेरा हाऊस सर्वांसाठी खुलंं करण्यात आलंं. या वास्तूची खासियत म्हणजे या एकाच वास्तूत सांगितिक मैफलीची मजा अनुभवण्यासाठी Concert Hall, ऑस्ट्रेलियन नृत्यनाट्याची (Ballet) लज्जत घेण्यासाठी Joan Sutherland Theatre, नाटकाच्या भावना अनुभवण्यासाठी नाट्यगृह, चित्रिकरणाकरिता तसेच ध्वनिमुद्रणाकरिता कलागार (Studio), छोट्या समारंभाकरिता,चर्चासत्रांसाठी सभागृह उपलब्ध आहे.
Concert Hall ची २,६७९, Joan Sutherland Theatre १५०७ तर नाट्यगृहाची ५४४ आसनांची आसन क्षमता आहे. Concert Hall मध्ये Sydney Symphony Orchestra व इतर लाईव्ह सांगितिक कार्यक्रम नेहमी सुरुच असतात.
या वास्तूचे मालकी हक्क New South Wales च्या सरकारच्या अधिन आहेत. या वास्तूचे मूळ वास्तूविशारद डॅनिश वास्तूविशारद जर्न उत्झॉन असून काही काळाने त्यांनी काही तांत्रिक कारणांमुळे राजीनामा दिला. त्यामुळे पुढे त्यांचंं काम ३ लोकांमध्ये वाटलं गेलं. ते तीन लोक म्हणजे पीटर हॉल, डेव्हीड लिटलमोर व लिओनल टॉड असून त्यातील अत्यंत महत्वाची म्हणजेच डिझायनिंगची कामगिरी पीटर हॉल यांची, बांधकामासाठी लागणार्या कागदपत्रांची तजविज व त्यासंबंधीचे पुरावे सांभाळण्याची कामगिरी लिओनल टॉड यांची तर बांधकामाची देखरेख करण्याची जबाबदारी डेव्हीड लिटलमोर यांची होती.
वास्तूमध्ये सगळ्या सुखसोई उपलब्ध आहेत. चारचाकी, दुचाकी वाहनांकरिता वाहनतळ उपलब्ध आहे. तुम्ही इथे सार्वजनिक वाहतूकीच्या सहाय्याने पोहोचू शकता.
ही वास्तू आपल्या बॉलीवूड मधील बर्याच चित्रपटांमध्ये दिसलेली आहे. ही वास्तू २० व्या शतकातली विशिष्ट तशीच प्रसिद्ध इमारतींपैकी एक वास्तू आहे. जेव्हा कधी तुम्ही प्रत्यक्षात ऑस्ट्रेलियामध्ये जाल तेव्हा ही वास्तू न विसरता बघा. कारण ही वास्तू प्रत्यक्षात बघूनच तुम्हांला आनंद लुटता येईल.
पत्ता : Bennelong Point, NSW, Sydney, Australia
संपर्क : +61 2 9250 7111
— आदित्य दि. संभूस (कलाकार, दिग्दर्शक, लेखक)
Leave a Reply