नवीन लेखन...

दुसऱ्या महायुद्धातील झुंजार रणरागिणी – व्हायोलेट झाबो

दुसऱ्या महायुद्धात जसे गुप्तहेर संघटनेत पुरुष होते,त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या स्त्री गुप्तहेर सुद्धा होत्या.त्यातील एक  व्हायोलेट.व्हायोलेटचा जन्म २६जुन १९२१ला paris येथे झाला.वयाच्या केवळ ११व्या वर्षी ती जिम,सायकलिंग,नेमबाजीत तरबेज झाली.१९४०मध्ये ती वूमन आर्मी मध्ये दाखल  झाली. पण लगेचच ती लंडन येथे परतली.व विमानाच्या शस्त्रकारखान्यात रुजू झाली.तिथेच तिची ओळख एटीनी झाबोशी झाली. २१ ऑगस्ट १९४०ला त्यांचे लग्न झाले.पण लगेचच एटीनिला दक्षिण आफ्रिकेत जावे लागले. व्हायोलेटने वायरलेस ऑपरेटरचा कोर्स केला.गुप्तहेरसंघटनेला आवश्यक प्रशिक्षण घेतले . जर्मन गेस्टापोनी तिला दोनदा अटक केली पण त्यांच्या हातावर तुरी देऊन ती सटकली होती.

१० जून १९४४ला ती एका मिशनवर  मोटारीतून निघाली. तिच्या विनंतीवरून तिला स्टेनगन व आठ मेगेजीन देण्यात आली.जरी जर्मन गेस्तापोनी फ्रेंचाना मोटारीतून प्रवास करायची बंदी केली होती.तरी ती मोटारीतून प्रवास करत होती.कारण त्यांना १०० किलोमीटर लांबचा प्रवास करायचा होता. ड्युफोर तिचा साथीदार होता. गाडी सुसाट वेगाने पळत होती आणि अचानक त्यांनी पाहिलं कि जर्मन तुकड्यांनी रस्ता अडवला होता.गाडीचा वेग मंदावला त्या दोघांनी मोटारीतून उडी मारली.ड्युफोर  डावीकडे पळाला आणि व्हायोलेटने  उजवीकडे झाडामागे आडोसा घेतला. जर्मनांच्या शास्त्रात्राच्या गाड्या आल्या.त्यातून तुफान गोळीबार होत होता, तरीही व्हायोलेट डगमगली नाही  व्हायोलेट रस्ता क्रॉसकरून द्युफोरला मिळाली.धावत त्यांनी शेते पार केली आणि टेकडीवरील झाडांचा आडोसा घेतला. व्हायोलेट अचानक पडली आणि तिचा घोटा जबरदस्त दुखावला.ड्युफोर तिच्या मदतीला धावला पण तिने द्युफोरची मदत नाकारली.व ती खुरडत मक्याच्या शेतात घुसली.तिचा घोटा कमालीचा दुखावला होता.तिने झाडाचा आधार घेतला.आणि जोरदार गोळीबार करून द्युफोरला संरक्षण दिले. व्हायोलेटने तीस मिनिटे जोरदार गोळीबार केला.जर्मनांना समजतच नव्हते कि गोळीबार नेमका कुठून होतोय आणि कितीजण गोळीबार करत आहेत. तिने कित्येक जर्मनांना निजधामाला पाठवले अनेक जखमी केले.जर्मनही प्रतिहल्ला करत होते. व्हायोलेट जर्मनांच्या गोळीबाराच्या टप्प्यातून बाहेर आली.पण अचानक तिला दोघांनी पकडले तिचे दोन्ही हात बांधले आणि  खेचत रेल्वेच्या ब्रिजजवळ घेऊन गेले.ती खूप संतापली होती.सगळे कपडे फाटले होते.केस अत्यंत विस्कळीत झाले होते.जर्मन अधिकार्याने विचारले मोटार कोणाची होती. व्हायोलेटने काहीच उत्तर दिले नाही.त्याने तिचे धाडसाबद्दल अभिनंदन केले.आणि तिच्या तोंडात सिगारेट खुपसली.तिने वेगाने सिगारेट थुंकली,आणि त्याच वेगाने अधिकार्याच्या तोंडावर थुंकली.तिला नंतर दुसरीकडे नेण्यात आले.तिचे हात मोकळे करण्यात आले आणि तिला स्वताची सिगारेट ओढण्याची परवानगी देण्यात आली. सैनिकांनी तिला जे फ्रेंच कैदी जर्मानाच्या ताब्यात होते तिथे पाठवण्यात आले.ती तारीख होती.८ ऑगस्ट १९४४.

व्हायोलेट आणि इतर स्त्री कैद्यांना रेवेन्सबर्ग  यातना तळावर पाठवण्यात आले.यातनातळावरील हे हाल अतिशय जीवघेणे असत.त्यातून जिवंत राहणे जवळजवळ अशक्य असे. व्हायोलेटला जंगलातील झाडे तोडण्याच्या कामाला जुंपण्यात आले.तिथे तिच्यावर खूप अत्याचार करण्यात आले. हाल हाल केले गेले.  पण ती डगमगली नाही.तो तिचा पिंडच नव्हता.५ फेब्रुवारी १९४५ रोजी तिचे हात बांधून मैदानात आणण्यात आले. गुढग्यावर बसवण्यात आले.जर्मनांच्या बंदुकीतून गोळी कडाडली.तिने व्हायोलेटच्या डोक्याच्या मागच्या बाजूचा वेध घेतला.तरी तिने हु कि चू केले नाही.फ्रेन्च्साठी हि रणरागिणी शहीद झाली.युद्ध संपल्यावर फ्रेन्चने तिला जॉर्ज क्रॉस,क्रोईस डे गुर आणि रेसीस्तंस मेडलने सन्मानित केले.

रवींद्र वाळिंबे

Avatar
About रवींद्र शरद वाळिंबे 87 Articles
मी हौशी लेखक आहे.मी विविध विषयावर लेखन करतो.कथा ललितलेखन व्यक्तिचित्रण हे माझे आवडीचे विषय आहेत.माझे आत्तापर्यंत कथा,ललितलेख प्रसिद्ध झाले आहेत.त्यापकी एका कथेला अनघा दिवाळी अंकात दुसरे पारितोषिक व एका कथेला मराठी साहित्य परिषद कल्याण शाखा चे उल्लेखनीय कथाचे पारितोषिक मिळाले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..