टी. ई. लॉरेन्स ऊर्फ लॉरेन्स ऑफ अरे यांचा जन्म १६ ऑगस्ट १८८८ रोजी झाला.
टी. ई. लॉरेन्स याचं एक अतिशय धाडसी व्यक्ती. कवी,अभ्यासक आणि योद्धा अशा विविध प्रकारच्या पलूंनी सुरस आयुष्य भरलेलं होतं. लॉरेन्स हा पहिल्या महायुद्धोत्तर काळातला ब्रिटनमधला ‘हीरो’ होता. त्याचं एकंदर व्यक्तिमत्त्व नायकाला शोभण्यासारखंच होतं. मोहिनी घालणारं वागणं-बोलणं, रणांगणावरचा पराक्रम, ज्ञानाच्या क्षेत्रातलं कर्तृत्व.
पहिल्या महायुद्धाच्या वेळेला ब्रिटिश सरकारचा एक सन्याधिकारी म्हणून तो मध्यपूर्वेत कार्यरत होता आणि तुर्कीविरुद्धच्या अरबांच्या बंडात त्यानं अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती.
काही माणसं अशी असतात की आपल्या हयातीतच त्यांना दंतकथांचा नायक बनण्याचं भाग्य लाभतं. अशा माणसांनाच मग लोक चालती-बोलती दंतकथा म्हणू लागतात. टॉमस एडवर्ड लॉरेन्स उर्फ टी. ई. लॉरेन्स उर्फ ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ हा माणूस त्याच प्रकारात मोडतो. १८८८ ते १९३५ असं फक्त ४६ वर्षांचं आयुष्य लाभलेल्या या माणसावर आत्तापर्यंत शंभरापेक्षाही जास्त पुस्तकं लिहिली गेली आहेत. पण, अजूनही त्याच्या आयुष्याबद्दलचं गूढ संपत नाही. घरातून पळून गेलेला हा माणूस ऑक्सफर्डचा पदवीधर काय बनतो; फ्रेंच, अरबी आणि प्राचीन ग्रीक या भाषांचा तज्ज्ञ काय बनतो; मध्य पूर्वेतला हजारो किमी भूप्रदेश पायी काय हिंडतो; होगार्थ आणि वूली अशा प्रख्यात उत्खनन शास्त्रज्ञांबरोबर उत्खननात भाग काय घेतो आणि मग एकदम अरबांचं सैन्य उभं करून तुर्कांच्या सैन्यावर गनिमी छापे काय घालतो, सगळंच विलक्षण! अतर्क्य! आपल्या हयातीतच चालती-बोलती दंतकथा बनलेल्या माणसांवर डेव्हिड लीन या प्रख्यात दिग्दर्शकाने १९६२ साली ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ या नावाचा चित्रपट बनवला.
जगभर प्रचंड गाजलेल्या या चित्रपटाने त्या काळात तिकीटबारीवर ७०० लक्ष डॉलर्सचा गल्ला गोळा केला होता. शिवाय सात ऑस्कर पारितोषिके पटकावली होती. पण, एवढं सगळं होऊनही त्याच्या जीवनाबद्दल साहित्यिकांना, संशोधकांना वाटणारं कुतूहल, गूढ कमी होत नाहीये. याचा पुरावा म्हणजे मायकेल कोर्डा या लेखकाचं नुकतंच आलेलं तब्बल साडेसातशे पानांचं लॉरेन्स चरित्र. टॉमस एडवर्ड लॉरेन्स या ऑक्सफर्ड पदवीधराला प्राचीन ग्रीक आणि अरबी या भाषा येत असल्यामुळे डेव्हिड जॉर्ज होगार्थ आणि लिओनार्ड वूली या उत्खनन शास्त्रज्ञांच्या दिमतीला देण्यात आलं. ते १९१२ साल होतं. युरोपात युद्धाचे ढग जमा होत होते. फ्रान्स आणि जर्मनी यांच्यात जुंपणार, याची स्पष्ट चिन्हं दिसत होती. प्रत्येक युरोपीय देश आपापला स्वार्थ सांभाळून दुसऱ्याकडून काय हडप करता येईल, याचा हिशोब मांडत होता. मोटार आणि विमान या दोन यंत्रांचा शोध अमेरिकेत लागला होता. पण, ही यंत्रं उद्याच्या जगावर राज्य करणार आहेत, याचा अंदाज अचूकपणे आला होता तो इंग्रज, फे्रंच आणि जर्मनांना. या यंत्रांना लागणारं इंधन होतं पेट्रोल नि ते विपुल प्रमाणात उपलब्ध होणार आहे अरबस्तानच्या रेताड वाळवंटाखाली, याचा वास युरोपीय महासत्तांना आला होता. अरबस्तान होता तुर्कांच्या साम्राज्यात. तेव्हा जर्मनीने घाई करून तुर्कस्थानशी मैत्री केली होती. जुनाट तुर्की सैन्याला अत्याधुनिक सैन्य बनवण्याचं कंत्राट जर्मन सेनापतींनी घेतलं होतं. परंतु, भूमध्य समुद्र ते तांबडा समुद्र ते हिंदी महासागर ते इराणी आखात, एवढ्या अफाट प्रदेशात पसरलेल्या अरबी द्वीपकल्पाची समग्र माहिती खुद्द तुर्क प्रशासकांनाच नव्हती, तिथे जर्मनांना ती कुठून मिळणार? म्हणजे गंमत पाहा. या अफाट वाळवंटाच्या खाली खनिज तेल नावाचा, पुढील काळात अत्यंत मौल्यवान ठरणारा पदार्थ, विपुल प्रमाणात आहे, याचा सुगावा युरोपीय सत्तांना लागला. हे वाळवंट अरब लोकांच्या ताब्यात होतं. अरबांच्या असंख्य टोळ्या नि अनेक सल्तनती म्हणजे छोटी-मोठी राज्यं होती. ही राज्यं नि या टोळ्या तुर्कस्थानच्या ताब्यात होत्या. जर्मनीने तुर्कस्थानशी मैत्री जोडली होती. युद्धात जर्मनी जिंकला असता, तर अरबांच्या भूमीचं दान त्यानेच स्वतःच्या पदरात पाडून घेतलं असतं. १९१४ साली फ्रान्स आणि जर्मनी यांच्यात जुंपली. ब्रिटन फ्रान्सच्या मदतीला धावला. तुर्कस्थान जर्मनीच्या बाजूने होताच. मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकेतलं अँग्लो-फे्रंच साम्राज्य उखडून काढणं, हे तुर्कस्थानचं उद्दिष्ट होतं आणि अरबस्तानी वाळवंटातला जास्तीत जास्त भाग आपल्या ताब्यात कसा आणता येईल, हे ब्रिटनचं उद्दिष्ट होतं. याकरिता १९१४ साली ब्रिटनच्या परराष्ट्र खात्याच्या ‘अरब ब्युरो’ या विभागाने होगार्थ आणि वूली यांना पाचारण केलं. त्यांच्याबरोबर टॉमस लॉरेन्स आलाच. अरेबियन वाळवंटाचे नकाशे बनवणं, विशेषतः लष्करीदृष्ट्या अत्यंत मोक्याच्या अशा नेगेव्ह वाळवंटाचा नकाशा बनवण्याचं काम त्यांच्यावर सोपवण्यात आलं. होगार्थ आणि वूली हे अत्यंत तरबेज असे उत्खननतज्ज्ञ होते, तर लॉरेन्स त्यांच्याच तालमीत तयार झाला होता. त्यांनी अतिशय उत्तम रीतीने हे काम पार पाडलं.
लॉरेन्सने वयाची पंचविशी नुकतीच ओलांडली होती. तो या वाळवंटी भागात शेकडो किमी पायी हिंडला होता. त्याला या प्रदेशाचा कानाकोपरा माहीत होता. अनेक अरबी टोळीप्रमुख त्याला ओळखत होते; एवढेच नव्हे, तर मान देत होते. एकंदरीत ब्रिटिश ‘अरब ब्युरो’ला अगदी हवा तसा माणूस मिळाला. वास्तविक लॉरेन्स हा ऑक्सफर्डचा पदवीधर म्हणजे नागरी पेशाचा इसम होता. लष्करी शिक्षण त्याने कधीच घेतलेलं नव्हतं. पण, ‘ब्युरोच्या’ आदेशानुसार ब्रिटिश लष्कराने लॉरेन्सला सरळ लेफ्टनंट कर्नलचा हुद्दा दिला. अरबांना तुर्की साम्राज्याचं जोखड खरं म्हणजे नको होतं. पण, अरबी टोळ्या आपसात भांडत होत्या. शिवाय त्यांचं युद्धतंत्र आणि युद्धसामग्री अगदीच मध्ययुगीन होती. तुर्कही मागासच असले तरी अरबांपेक्षा नक्कीच सरस होते नि त्यांच्या पाठीशी अत्याधुनिक जर्मनी होता. तेव्हा लेफ्टनंट कर्नल लॉरेन्सवर अशी कामगिरी सोपवण्यात आली की, त्याने आपसात भांडणाऱ्या अरबी टोळ्यांना एकत्र करायचं, त्यांचं शक्य तितकं संघटित सैन्य बनवायचं आणि गनिमी पद्धतीने तुर्की सैन्यावर छापे घालून त्यांना हैराण करून सोडायचं. थोडक्यात, कधीही लष्करी प्रशिक्षण न घेतलेल्या एका नागरी माणसावर एक सैन्य उभं करण्याची, एवढंच नव्हे, तर त्या सैन्याला घेऊन लढाया करण्याची जबाबदारी टाकण्यात आली. आणि मग जे काही घडलं ते पाहून ब्रिटिश सेनानी आणि ब्रिटिश मुत्सद्दी आश्चर्यचकित नि आनंदित होऊन गेले. सुरवंटाचं फुलपाखरू नव्हे, शिकारी ससाणा बनला. दिल्लीच्या बादशहाकडून हिंदवी स्वराज्याच्या सनदा आणायला निघालेले बाळाजी विश्वनाथ पेशवे वाटेत त्र्यंबकेश्वरला उतरले. महादेवभट हिंगणे हे पेशव्यांचे तिथले क्षेत्रोपाध्ये. पेशवे हिंगण्यांना म्हणाले, “महादेवभट चला आमच्याबरोबर दिल्लीला.” महादेवभट खरंच त्यांच्याबरोबर दिल्लीला गेले. नुसते गेले नाहीत; दिल्ली दरबारात स्वराज्याचे वकील म्हणून तिथेच राहिले आणि पुढची पंचवीस वर्षे आपल्या बुद्धिकौशल्याने त्यांनी मुघली सरदारांना खेळवलं. ऑक्सफर्ड विद्वान म्हणजे अॅगकेडमीशियन असणाऱ्या लॉरेन्सने हां-हां म्हणता लेफ्टनंट कर्नलच्या म्हणजे प्रशिक्षित सेनाधिकाऱ्याच्या भूमिकेत प्रवेश केला. एकमेकांचे गळे कापणाऱ्या अरबी टोळीप्रमुखांना एकत्र आणलं, त्यांच्या पुन्हा छोट्या टोळ्या बनवल्या नि वेगवेगळ्या तुर्की लष्करी ठाण्यांवर गनिमी हल्ले चढवायला सुरुवात केली. सुरवंटाचं रूपांतर अशा तऱ्हेने बहिरी ससाण्यात झाल्याचं पाहून ब्रिटिश सेनानी आणि मुत्सद्यांना सानंद आश्चर्य वाटल्यास काय नवल?
अरबांच्या या उठावामुळे बरीच मोठी तुर्की सेना त्यांच्या बंदोबस्तासाठी अडकून पडली. मुख्य युद्धातून तुर्कांची तेवढी कुमक बाजूला झाली. १९१८च्या जानेवारीत अरबांच्या या मागास बंडखोर टोळ्यांनी तुलनेने आधुनिक अशा तुर्की सैन्यावर ताफिलेह या ठिकाणी चक्क विजय मिळवला. तुर्क सेनानी भांबावले. जर्मन सेनानी चकित झाले. उलट अरबांचा आत्मविश्वास दुणावला. या सगळ्याचा शिल्पकार होता लेफ्टनंट कर्नल टी. ई. लॉरेन्स किंवा अरबांचा लाडका बनलेला ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया.’ महायुद्ध संपल्यावर व्हर्साय या ठिकाणी तह झाला. तुर्क साम्राज्य मोडीत निघालं. इराक आणि जॉर्डन हे स्वतंत्र अरब देश अस्तित्वात आले. पॅलेस्टाईनसह बराच मोठा अरबी भूप्रदेश ब्रिटनच्या ताब्यात आला. या सगळ्या कावेबाज मुत्सद्दी वाटाघाटींमध्येही लॉरेन्सचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. अशा कामगिरीमुळे लॉरेन्सचं मित्रमंडळ प्रचंड वाढलं. विन्स्टन चर्चिल त्याचा खास दोस्त बनला. चर्चिलने ब्रिटिश मंत्रिमंडळातली अनेक खाती सांभाळली होती. तत्कालीन पंतप्रधान लॉईड जॉर्ज याचा चर्चिल हा उजवा हात समजला जात असे, अशा चर्चिलची दोस्ती मिळवणं ही सोपी गोष्ट नव्हती. लॉरेन्सची कामगिरी अफलातून होतीच, पण त्याचं बोलणं-वागणंही मोठं आकर्षक, एक प्रकारची मोहिनी घालणारं आणि काहीसं गूढ होतं. त्यामुळे युद्धोत्तर ब्रिटिश समाजात तो कमालीचा लोकप्रिय झाला.
युद्ध संपल्यावर त्याची तात्कालिक युद्धसेवा संपली. पण, या गूढ स्वभावाच्या माणसाला काय सणक आली कुणास ठाऊक! विमानदल हे युद्धात नव्यानेच वापरात आलं होतं आणि आता त्याचा जोरदार विकास करणं चालू होतं. एक दिवस हा इसम उठला नि रॉयल एअरफोेर्सच्या कार्यालयात जाऊन ‘जॉन रॉस’ या नावाने त्याने सामान्य वायुसैनिकाच्या जागेसाठी अर्ज केला. कनिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याला ओळखलं नाही. पण, वरिष्ठ अधिकारी चाट पडले. ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ आपल्या खात्याकडे नोकरी मागतोय आणि ती सुद्धा सामान्य सैनिकाची? पण, काहीतरी चक्रं फिरली आणि लॉरेन्सला ती नोकरी देण्यात आली. लॉरेन्सला भरमसाठ वेगाने फटफटी चालवण्याची फार हौस होती. हा गूढ इसम अंगावर सामान्य वायुदल कर्मचाऱ्याचा गणवेश चढवून भन्नाट फटफटी चालवत लंडन शहरात फिरायचा. कधी चर्चिलच्या बंगल्यावर जायचा, तर कधी बर्नार्ड शॉच्या बंगल्यावर. तेही त्याच्याशी गप्पा मारायला उत्सुक असायचे. सामान्य जनतेला, पत्रकारांना खूप नवल वाटायचं. मग, लॉरेन्सच्या या वागण्याबद्दल नाना अफवा उठायच्या.
१९२६ ते १९२८ अशी दोन वर्षे लॉरेन्सची बदली हिंदुस्थानात झाली. पण ते कुठे होते, त्याने नेमकं काय केलं, हे अगदी आजही अज्ञात आहे. साधारणपणे असा तर्क काढला जातो की, काहीतरी खास हेरगिरीच्या कामावर ही नेमणूक असावी. सहा दिवसांनी रुग्णालयात मरण पावला. त्याच्यावर उपचार करणारा डॉक्टर ह्यू क्रेन्स हा यामुळे फार दुःखी झाला. त्याने फटफटीस्वारांना होणारे अपघात या विषयावर बराच अभ्यास केला होता. त्यातूनच हेल्मेटचा शोध लावला. म्हणजे आज जगभरच्या दुचाकीस्वारांना वरदान ठरलेलं हेल्मेट हे लॉरेन्सच्या मृत्यूतून जन्मलं.
एकंदरीत, लॉरेन्स हा पहिल्या महायुद्धोत्तर काळातला ब्रिटनमधला ‘हीरो’ होता. त्याचं एकंदर व्यक्तिमत्त्व नायकाला शोभण्यासारखंच होतं. मोहिनी घालणारं वागणं-बोलणं, रणांगणावरचा पराक्रम, ज्ञानाच्या क्षेत्रातलं कर्तृत्व. पण, त्याच्या व्यक्तिमत्त्वात यापेक्षाही अधिक काहीतरी गूढ होतं. ते आजही उकललेलं नाही. भांडखोर अरब टोळ्यांना त्याने कसं संघटित केलं? हा नागरी पेशाचा इसम इतक्या सहजपणे लष्करी पेशाशी कसा समरस झाला? त्याने वायुदलात सामान्य नोकरी का पत्करली? डेव्हिड लीन यांनी टी. ई. लॉरेन्स- यांच्या आयुष्यावर ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ हा चित्रपट बनवला होता.
१९३५ साली भरमसाठ वेगाने मोटर सायकल चालवताना वाटेत आलेल्या दोन सायकलस्वार विद्यार्थ्यांना वाचवताना लॉरेन्स जबर जखमी झाला आणि टी. ई. लॉरेन्सचे निधन १९ मे १९३५ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
संदर्भ: इंटरनेट/मल्हार कृष्ण गोखले.
पुणे.
Leave a Reply