टाळ हाती असते तेव्हा
सूर कानी घुमतो
टाळ तेच हातूनी सुटती
चोप माथी बसतो!!
अर्थ–
नातं हे मंदिरातल्या मृदंगाच्या आवाजावर आनंदाने डोलणाऱ्या त्या हातातील टाळेसारखं असतं. दिशा ते ठरवीत नाही, कधी सुख मानायचं हे ते ठरवीत नाही, कोणत्या गोष्टीं वर ताल धरायचा हेही टाळ ठरवीत नाही तर केवळ ज्यांच्या हाती आपण आहोत त्यांचा इशाऱ्यावर ते आपले काम चोख बजावतात. हातातली टाळ वाजली की त्यातून येणाऱ्या आवाजाचा एक वेगळाच आनंद आपल्या शरीरात फुलून येतो अन आपणही त्या सुरात बेधुंद होऊन देवाच्या नामस्मरणात तल्लीन होऊन जातो.
पण जेव्हा त्या टाळे चा उपयोग जर कुणी रागाच्या भरात शस्त्र म्हणून केला तर? ती टाळ कोणास फेकून मारली तर? डोक्याचं काही खरे नाही.
नात्यांचे ही असेच असते, ज्या हातांत ते असते त्यांच्यावर अवलंबून असते स्वर कानांना आणि मनाला आनंद देणारा काढायचा की डोक्याला चोप देणारा.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply