तब्बूचं पूर्ण नाव तब्बसुम फातिमा हाश्मी आहे, मात्र लोक त्यांना तब्बू म्हणून ओळखतात. तिचा जन्म ४ नोव्हेंबर १९७१ रोजी झाला. तब्बूच्या आई वडिलांची फारकत झाली तेव्हा तब्बू खूप लहान होती, तब्बूने आपल्या वडिलांना पाहिलं नसल्याचंही सांगण्यात येतं. शबाना आझमींची पुतणी आणि फराहाची बहीण असल्याने तब्बूचे बालपणच ग्लॅमर जगतात गेले. वयाच्या १४ व्या वर्षीच तिने ‘हम नौजवान’ मधून पदार्पण केले होते. तब्बूने आपल्या बॉलीवूड करिअरमध्ये आपल्या लूक्स सोबत अनेक प्रयोग केले आहेत. मात्र तब्बूने आपली हेअर स्टाईल कधी बदलली नाही, तब्बू आपले काळेभोर लांब केस आपली संपत्ती मानते. रुक रुक, अरे बाबा रुक’ म्हणत ती या सिनेमासृष्टीत आली. आल्यापासून आपल्या एक एक चित्रपटामधून सुरू झालेली तिची ही यात्रा तिला शब्दश: विजयपथावर घेऊन गेली. एकाहून एक वेगवेगळय़ा प्रकारच्या भूमिका केलेल्या तब्बूने आपले स्वत:चे असे एक स्थान या चित्रपटसृष्टीत निर्माण केले आहे.
‘माचीस, ‘हुतुतू, ‘बॉर्डर, ‘चांदनी बार, ‘अस्तीत्व’ यासारख्या चित्रपटात सुंदर भूमिका केल्या आहेत. हिंदीत एवढी यशस्वी असलेली तब्बू दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्येही मोठ्या प्रमाणावर काम करत असते. विशेषतः साथऊच्या चित्रपटांमध्ये तब्बूचा बोल्ड लूक आपल्याला पाहायला मिळतो. तब्बूला माचिस आणि चांदनी बारसाठी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत, दिग्दर्शक साजिद नाडियाडवालाला डेट केलेल्या तब्बूचे नाव दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुनसोबत जुळले होते. यांच्या अफेअर खूप चर्चा एकवटली होती. परंतु दोघांचे नाते पुढे जाऊ शकले नाही. नागार्जुन विवाहित होते आणि त्यांना आपल्या पत्नीला घटस्फोट द्यायचा नव्हता. आपल्या नात्याचे काहीच भविष्य नाहीये याची जाणीव झाल्यानंतर तब्बूने नागार्जुनसोबतचे नाते तोडले. तब्बूचं लग्न झालेलं नाही. तब्बूला फोटोग्राफीची आवड आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply