आवडले अथवा ना आवडले
तडजोडीविना जगणे कसले
मनाला, सामंजस्ये सावरावे
जगी यावीण दूजे सुख कसले
व्यक्ती तितक्या भिन्न प्रकृती
सुखदुःख, भाळीचे वेगवेगळे
मनामनांचे अंतरंगही संभ्रमी
जग सारे साशंकतेने भारलेले
इथे कोण आपुले कोण परके
अजुनही न कुणास कळलेले..
जगी जगणे, कसरत तारेवरची
प्रारब्धभोग न कुणास चुकलेले
दृष्टांताचे भास सारे मृगजळी
जगती या व्यर्थ धावणे ठरलेले
जन्ममृत्यु हे नग्नसत्य या सृष्टिचे
जीवाजीवाच्या पाचविला पुजलेले
— वि.ग.सातपुते. (भावकवी)
रचना क्र. १३७.
२० – ५ – २०२२.
Leave a Reply