नवीन लेखन...

खबरदारी घ्या, विद्युत अपघात टाळा

कोणत्याही मूलभूत गरजेइतकीच वीजही आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनली आहे. जीवन सुखकर बनवण्यासाठी ज्याप्रमाणे आपल्याला विजेचा फायदा होऊ शकतो, त्याचप्रमाणे ती वापरताना योग्य काळजी घेतली नाही, तर विद्युत अपघात घडून नुकसान होऊ शकते. सर्वांनी सुरक्षिततेचे नियम पाळले तर हे अपघात टाळता येतात. ११ ते १७ जानेवारीदरम्यान महाराष्ट्रात विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा केला जात आहे. त्यानिमित्त…

शॉर्टसर्किटपासून होणारे अपघात असोत की, वीज हाताळताना होणारे अपघात, हे खबरदारी न घेतल्यामुळेच होतात. शहरापासून ते ग्रामीण भागापर्यंत विद्युत अपघाताच्या घटना पाहता आता अधिक जागरूकतेने व सुरक्षितपणे विजेचा वापर करणे क्रमप्राप्त झाले आहे.  याकरिता प्रभावी जनजागृतीची आवश्यकता आहे.

चुकीला माफी नाही : ‘वीज’ ही अशी बाब आहे, ही डोळ्याने दिसत नाही परंतु ती वापरताना काळजी घेतली नाही तर होणारे परिणाम टाळता येत नाहीत.  वीज हाताळताना चुकीला माफी नाही.  त्यामुळे वीज उपकरणे हाताळताना वापरताना काय काळजी घ्यावी, याचा प्रत्येकानेच गांभीर्याने विचार करावा.

दर्जेदार उपकरणांचा वापर :  घर, उद्योग,कार्यालय अथवा शेती असो, वीज वापरताना प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे.  वीजपुरवठा घेताना किंवा वेळोवेळी विद्युत केबल, स्विचेस अथवा इतर उपकरणे ही ‘आयएसआय’प्रमाणि असल्याचे व योग्य क्षमतेचे असल्याची खात्री करावी. विद्युत सर्किटवर क्षमतेपेक्षा जास्त भार टाकू नये. प्रमाणित ठेकेदारांकडूनच विद्युतीकरणाची कामे कघ्यावीत. वायरिंगसाठी योग्य क्षमतेचे एमसीबी (मिनिएचर सर्किट ब्रेकर) वापरावेत, जेणेकरून अतिभार किंवा शॉर्टसर्किटमुळे धोका निर्माण होणार नाही. गुणवत्ता नियंत्रण मंडळाने प्रमाणित केलेली विद्युत उपकरणेच वापरावीत. उदा. मिक्सर, पाण्याचे हीटर, टोस्टर, ग्राईंडर, फ्रीज, वॉशिंग मशीन इत्यादी.

योग्य अर्थिंग :  वीज वापरामध्ये अर्थिंग हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. अनेक अपघात हे योग्य प्रकाराची अर्थिंग न केल्यामुळे घडल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे वायरिंग इन्स्टॉलेशनसाठी कॉपर प्लेट किंवा कॉपर रॉडची अर्थिंग कार्यक्षमपणे घेणे सुरक्षेच्या दृष्टीने गरजेचे आहे.

इन्सुलेटेड वायरचा उपयोग :  अर्थ लीकेजपासून होणारा धोका टाळण्यासाठी ईएलसीबी (अर्थ लीकेज सर्किट ब्रेकर) वापरावे. मोठमोठ्या अपार्टमेंटमध्ये 20 ते 50 मीटरची स्वतंत्र मीटर रूम असते. बऱ्याच वेळा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. मीटर रूम स्वच्छ, प्रकाशित व हवेशीर असली पाहिजे. पावसाळ्यात मीटर रूममध्ये पाणी जाणार नाही; त्याचबरोबर भिंती ओल्या होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. मीटर रूमचा वापर स्टोअर रूम म्हणून करू नये. मीटर रूममध्ये उंदरांचा वावर होणार नाही, याकडेही लक्ष दिले पाहिजे. तेथे ज्वालाग्राही पदार्थ ठेवणे टाळायला हवे. न्युट्रल वायरसाठी उघड्या वायरचा वापर न करता इन्सुलेटेड वायरचाच वापर करा. एका सर्किटमध्ये मल्टी प्लग/तारा घालू नका. त्यामुळे शॉर्टसर्किट होऊन आगीस निमंत्रण मिळते.

मेन स्विचचा वापर : शॉर्टसर्किटमुळे आग लागल्यास प्रथम मेन स्विच बंद करा. विद्युतरोधक अग्निशमनचा वापर करा. पाण्याचा वापर करू नका. प्लग, पिन, बटण, बोर्ड यांना तडे गेल्यास ती त्वरित बदलावीत.  पंखे, इस्त्री, कूलर वापरताना त्यात वीजप्रवाह उतरू शकतो. याची जाणीव ठेवूनच सावधानतेने ती हाताळावीत.

आयुष्याचे मोल जाणा : विजेविषयी अज्ञान असणे, ही गोष्ट जितकी भयानक आहे, त्याहीपेक्षा ज्ञान असूनही निष्काळजीपणा, फाजील आत्मविश्वास हे अधिक भयंकर आहे. अतिउत्साहात अगदी निष्णात लोकदेखील हातात रबरी ग्लोव्हज घालणे, पायात सेफ्टी बूट वापरणे तसेच वीजपुरवठा बंद करून मग काम करणे, अशा छोट्याछोट्या बाबींकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे जीवितहानी झाल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. रात्रंदिवस विजेच्या क्षेत्रात काम करणारे कामगार, जनमित्र, वायरमन यांनी आपले जीवनमूल्य जाणून घेऊन आपल्यावर आपल्या कुटुंबाचीही जबाबदारी असल्याचे भान ठेवूनच विद्युतीकरणाचे काम करावे. सुरक्षेचे उपाय हे केवळ आपल्यासाठी नसून आपल्याशी निगडित प्रत्येक घटकासाठी तितकेच महत्वाचे आहेत, याची जाणीव सातत्याने ठेवणे महत्वाचे आहे

दैनंदिन वीज वापरातील महत्वाच्या बाबी :
विद्युत उपकरणे ओल्या हाताने हाताळू नका.  वीजवाहिनीच्या खाली किंवा जवळ कोणतेही बांधकाम करू नका. विद्युत खांब किंवा तणाव तारांना गुरे, ढोरे बांधू नका. विद्युतप्रवाह सोडू नका. तात्पुरते लोंबकळणारे वायर वापरू नका. विजेचा अनधिकृत वापर टाळा. कुलरमध्ये पाणी टाकताना वीजपुरवठा बंद ठेवा. विजेच्या तारेखाली कापलेले पीक ठेवू नका. कपडे वाळवण्यासाठी वीज तारांचा वापर करू नका.  गंमत म्हणून विजेच्या खांबावर चढणे टाळा. विजेच्या तारा तुटून जमिनीवर पडल्या असतील तर त्यांना स्पर्श करू नका किंवा त्या ओलांडून जाण्याचा प्रयत्न करु नका व इतरांनाही तसे करू देऊ नका.

— ज्ञानेश्वर आर्दड,
जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, औरंगाबाद परिमंडल

लेखकाचे नाव :
ज्ञानेश्वर आर्दड
लेखकाचा ई-मेल :
vdnyan@gmail.com

Avatar
About Guest Author 525 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..