तक्षशिला विद्यापीठाला वित्तीय सहाय्य
तक्षशिला विद्यापीठाला सर्वप्रकारचे वित्तीय सहाय्य समाजाकडून केले जात असे. कारण गुरु, विद्यार्थ्यांची भोजन व वास्तव्याची सोय करीत असत. कुठल्याही विद्यार्थ्याला शुल्क भरायची सक्ती नसे. शुल्क न भरणाऱ्या विद्यार्थ्याना काढून टाकले जात नसे किंवा त्याला वेगळी वागणूक दिली जात नसे. किंबहुना शुल्क भरलेच पाहिजे याचा तीव्र निषेध केला जाई.
हिंदू धर्मग्रंथात पैशांसाठी देवाणघेवाण करणे व विद्यार्थ्यांकडून पैसे वसूल करणाऱ्या बद्दल कडक नियम होते. असे करणाऱ्या गुरूना कडक कारवाईला सामोरे जावे लागे. तरीही विद्यापीठाला आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत नसे. गुरूंचे ज्ञान व अभ्यास बघून श्रीमंत लोक व कुटुंब भरपूर आर्थिक मदत करत असत.
एकतर पाठ्यक्रम सुरू होण्याआधी किंवा संपल्यावर देत असत. शुल्क भरणारे व न भरणारे एकाच पद्धतीच शिक्षण दिले जाई. राजा सुद्धा मदत कोणताही दबाव न आणता करत असे. गुरुचा शब्द अंतिम असे. अर्थात विद्यार्थी सुद्धा दक्षिणा म्हणून काहीतरी देत असत. अर्थात ती पुरेशी नसे. बराचदा खडावा, छत्री, वस्त्र या स्वरूपात असे. समाज कर्तव्य निभावण्यात जागरूक असे.
बऱ्याच वेळी विद्यार्थी ज्या राज्यातून आला असे त्या राज्याचा राजा त्या विद्यार्थ्याचा खर्च करत असे. गुरूचे ध्येय पैसे कमावणे नसे. त्यामुळे गरीब जनताही शिधा, शिजवलेले अन्न अश्या स्वरूपात मदत करत असे. गरीब विद्यार्थी राजांकडे गुरूला गुरुदक्षिणा देण्यासाठी मदत मागत. ती राजा मान्य करत असे. यांचे उदाहरण म्हणजे आयोध्येचा राजा रघू, त्याने वर्तणू चा शिष्य कौसत याला चौदा कोटी सुवर्ण मुद्रा दिल्या.
विद्यार्थ्याना किंवा गुरूना आर्थिक मदत न करणे हा राजाला कलंक मानला जात असे. गुरूला करातून वगळले जात असे. हे सर्व विद्यार्थ्याना विनाशुल्क शिक्षण व त्यांच्या राहाण्या खाण्याची व्यवस्था करण्यासाठी केले जात असे.
– रवींद्र शरद वाळिंबे
Leave a Reply