कळेना चालला आहे तुझा त्रागा कशाला
कधीचा राहिला आहेस तू जागा? कशाला ?
जिथे चिटपाखरूही फारसे फिरकत नसावे
मला बोलावते आहे अशी जागा कशाला ?
तुलाही वाटले होतेच की हे शेवटाला –
कुणाला वावगे वाटेलसे वागा कशाला !
किती फुललेत रस्ते दाट गर्दीने सभोती
हव्या आहेत लोकांना तरी बागा कशाला ?
असे झाकायचे आहे खरोखर काय नक्की ?
हवासा वाटतो इतका तलम धागा कशाला ?
ठिगळ लावायचे इतकेच आहे काम केवळ
हवा आहे तरी इतका तलम धागा कशाला ?
— ॐकार जोशी
Leave a Reply