श्रीकृष्णाचे जीवन बनली एक गाथा
यशस्वी होई तुमचे जीवन चिंतन त्याचे करिता ||१||
तल्लीनतेच्या गुणामध्यें लपला आहे ईश्वर
तल्लीनतेचा आनंद लुटा शिकवी तुम्हा मुरलीधर ||२||
बालपणीच्या खेळामध्ये जमविले सारे सवंगडी
एकाग्रतेने खेळवूनी आनंद पदरीं पाडी ||३||
मुरलीचा तो नाद मधूर मन गेले हरपूनी
डोलूं लागले सारे भवतीं मग्न झाल्या गौळणी ||४||
टिपऱ्या घेवूनी नाच नाचला गोपी साऱ्या जमवूनी
लय लागूनी जातां सारी संसार गेली विसरूनी ||५||
राधा तर वेडी झाली तुझ्यावरील प्रेमानें
लूटून जावे प्रेमामध्यें शिकविले श्रीकृष्णानें ||६||
गीतेचे तर ज्ञान आगळे उकलेले जीवन कोडे
आत्मज्ञान घेतां त्यातील जीवनाचे दर्शन घडे ||७||
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply