श्रीकृष्णाचे जीवन बनली एक गाथा,
यशस्वी होई तुमचे जीवन चिंतन त्याचे करिता ।।१।।
तल्लीनतेच्या गुणामध्यें लपला आहे ईश्वर,
तल्लीनतेचा आनंद लुटा शिकवी तुम्हा मुरलीधर ।।२।।
बालपणीच्या खेळामध्ये जमविले सारे सवंगडी,
एकाग्रतेने खेळवूनी आनंद पदरीं पाडी ।।३।।
मुरलीचा तो नाद मधूर मन गेले हरपूनी,
डोलूं लागले सारे भवतीं मग्न झाल्या गौळणी ।।४।।
टिपऱ्या घेवूनी नाच नाचला गोपी साऱ्या जमवूनी,
लय लागूनी जातां सारी संसार गेली विसरूनी ।।५।।
राधा तर वेडी झाली तुझ्यावरील प्रेमानें,
लुटून जावे प्रेमामध्यें शिकविले श्रीकृष्णानें ।।६।।
गीतेचे तर ज्ञान आगळे उकलेले जीवन कोडे,
आत्मज्ञान घेतां त्यातील जीवनाचे दर्शन घडे ।।७।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply