नवीन लेखन...

टॅक्स डिडक्टर्स अकाऊंट नंबर

टॅक्स डिडक्टचा काय खाते क्रमांक म्हणजेच टॅन.

पॅन स्वतःच्या आयकरासाठी असतो. तर  टॅक्स डिडक्शन अकाऊंट नंबर आपण खर्च करत असलेल्या व्यक्तिंची माहिती देण्यासाठी असतो. पॅन प्रत्येक व्यक्तीला कंपल्सरी असतो. कमवत्या व्यक्तीकडे पॅन असलाच पाहिजे. पण टॅन सर्वांसाठी गरजेचा नाही. ज्या करदात्यांनी करकपात करावयाची असते, त्यांनी टॅक्स डिडक्शन अकाऊंट नंबर घेतला पाहिजे. पॅन आणि टॅन दोन्ही १० न्युमरिकच (अंकी व अक्षरी) असतो. पण टॅन रिजन, प्रांतवाईज, त्याची सिरियल सुरु होते. नाशिक, धुळे, जळगाव, अहदनगर, नंदुरबार, इत्यादी जिल्ह्यांसाठी टॅनची सुरु सुरुवात NSK  ने होते. करकपातीसाठी TAN पाहिजे असतो.

प्रथम आपण करकपात म्हणजे काय ते पाहू. प्रत्येक व्यक्ती तिचे उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करीत असते. वाढती महागाई आणि भविष्यासाठी तरतुद पाहिजे असेल तर प्रत्येक वर्षी आपले उत्पन्न वाढले पाहिजे. पण वाढत गेलेल्या उत्पन्नाबरोबर आयकर भरण्याची जबाबदारी वाढते, तरीदेखील या धकाधकीच्या युगात आपणांसारख्या सुज्ञ करदात्यास वर्षाच्या शेवटी वाढलेल्या उत्पन्नावर कर भरण्याची इच्छा असून तेवढे पैसे जवळ राहत नाही. म्हणून मुदतीत जर विवरणपत्र दाखल करावेच लागले तर चुकीचे किवा अपुर्‍या उत्पन्नाचे विवरणपत्र दाखल करण्याचा विचार येणे साहजिकच आहे.

या वाईट प्रथेवर तोडगा म्हणून TAN ही चांगली पद्धत आहे. बर्‍याच वेळी काही लोकं याला विनोदाने tedius (कंटाळवाणे) असेही म्हणतात. करकपातीच्या तरतुदी सर्वांना लागू नाहीत. वैयक्तिक प्रोप्रायटरी फर्म किवा संयुक्त हिदु कुटुंबाचे ऑडिट नसेल तर TDS ची तरतुद लागू नाही. सर्व कृत्रि व्यक्ती उदा. फर्म, कंपनी, सहकारी संस्था आणि ज्यांना आयकर कायद्याखाली लेखापरीक्षण करुन घ्यावे लागते अशा सर्वांना करकपातीच्या तरतुदी लागू आहे.

अंदाजित उत्पन्नाच्या योजनेपेक्षा की उत्पन्न दाखवणारे करदाते दुसर्‍या वर्षापासून करकपात करण्यास जबाबदार आहे. चालू वर्षापूर्वीच ज्यांचे ऑडिट होते किवा सर्व नैसर्गिक व्यक्ती सोडून सर्वांना TDS भरावा लागतो. वार्षिक उलाढाल टॅक्स ऑडिटच्या मर्यादेपेक्षा जास्त असणार्‍या फर्मलाही TDS भरावा लागते. TDS म्हणजे दुसर्‍याच्या उत्पन्नावर टॅक्स कापून तो सरकारला जा करणे. अर्थशास्त्राच्या नियाप्राणे एकाचा खर्च हे दुसर्‍याचे उत्पन्न असते. म्हणून ज्यांनी मोठ्या रकमेचे खर्च केले; त्याचे पेमंट अदा करतानाच खर्चावर टॅक्स कापून तो सरकारला जा करावा; यामुळे तिन्हही स्तरावर अप्रत्यक्ष फायदाच होतो. प्रत्यक्ष उत्पन्न होत असतानाच व्यक्तीच्या उत्पन्नावरील काही टॅक्स मार्चपूर्वीच सरकारला ळितो. त्याुळे आयकर खात्यास खेळते भांडवल त्वरीत ळिते. सरकारला देखील प्रत्येक महिन्यात महसूल जमा होत असल्यामुळे नोकरदारांचे पगार व इतर खर्चासाठी चिता राहत नाही. ज्याला उत्पन्न मिळते त्याला कापलेल्या कराचे क्रेडिट वर्षाचे शेवटी मिळते म्हणजे एक प्रकारचा त्याचा आगावूच टॅक्स जम असतो. मार्चनंतर त्याला तो परत मिळूही शकतो किवा जास्त उत्पन्न असल्यास बाकी थोडी रक्कम Self Assessment  ने भरुन त्याचे विवरणपत्र सादर होते.

खर्च करणार्‍याने जर टॅक्स कापला नाही तर तो खर्च त्याने टाकलाच नाही म्हणून त्याच्या खर्चाची वजावट मिळत नाही. म्हणजे मोठमोठ्या फर्म वर्षाच्या शेवटी त्यांचे नफातोटा पत्रक तयार करतात. त्या लाभ हानी खात्यात एका बाजुला सर्व उत्पन्न व दुसर्‍या बाजुला खर्च असतात. उत्पन्नाची बाजु खर्चाच्या बाजुपेक्षा मोठी असल्यास त्या खात्याला Net Profit  निव्वळ नफा भांडवल खात्यास वर्ग ट्रान्सफर केला जातो. जेवढा योग्य नफा वाढेल तेवढे कायदेशीर भांडवल वाढेल. पण या नफातोटा पत्रकात दाखवलेल्या इतर सर्व खर्चावर करकपात केली नाही तर तेवढी रक्कम निव्वळ नफ्यात वाढवली जाते. म्हणजे दोन-तीन वर्षांनंतर राहिलेल्या रकमेवर टॅक्स भरुनही आपले उत्पन्न व्हाईट होत नाही. म्हणून करकपातीकडे दुर्लक्ष नको.

ज्या मोठ्या डिडक्टरने करकपात करायची राहिली तर तो TDS स्वतःहून भरावयाचा असतो. उशीरा भरलेल्या ढTDS वर व्याजाचा नाहक भुर्दंड बसतो. जोपर्यंत उत्पन्न मिळवणारी व्यक्ती आपल्या तावडीत आहे तोपर्यंत अशा करकपात करणार्‍या डिडक्टरने कायदेशीर भरपूर, सर्व टॅक्स कापून घ्यावा; ज्याला पट देतो त्याचा PAN   मिळवून घ्यावा. सर्व ऑडिट आणि कृत्रिम व्यक्तींनी खर्च करताना जो टॅक्स कापून भरावयाचा असतो ते करकपातीचे पैसे भरणे; त्यासंबंधीची सरकारला माहिती देणे यासाठी TAN काढला जातो. टॅक्स कापल्यानंतर तो रितसर सरकारला TAN नंबरद्वारे भरावा. ज्याचा टॅक्स कापून भरला त्याला तसे प्रमाणपत्र F16A एका हिन्याच्या द्यावा हे करकपातीचा फर्मसाठी फायद्याचेच आहे.

— सदाशिव गायकवाड
करसल्लागार, नाशिक.
फो. (०२५३) २५९३५०७, ९३७१५२७१११.

सदाशिव गायकवाड
About सदाशिव गायकवाड 3 Articles
श्री सदाशिव गायकवाड हे नाशिक येथे करसल्लागार आहेत. ते `कर' या विषयावर विविध ठिकाणी व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..