लय फोफावलय तणकटं….
धुरे सोडून मध्ये रानातं घुसलयं…..
रान कमी पडलं मनुन काय की,
आत्ता डाळणाच्या उरावरंबी फोफावलयं…
आत्ता तं पिकबी तणकटाच्या सावलीपुढं,
निमुट मानं टाकुण मुक उभ दिसायलयं…
काल घरातुन निंघताना भिंतीवर
एक पिंपळाचं झाड पाह्यलं…
मनात विचार आला,
मायझं,भुतायलं जागा कमी पडायलीय,
मनुनं ईथबी एक उगवलय काय की?
लय फोफावलयं….
गल्लीतंबी अन दिल्लीतंबी,
घरातंबी अन दारातंबी…
कुठं नाही मनुन सांगु,
ईथं जागाचं शिल्लक राह्यली नाही…
रस्त्यावुन पुढ चलतांनी,
याच तनकटांचे दोरखंडं व्हवून,
माघं खेचतायतं मलं…
असं वारंवार जाणवायलय आजकालं…
आज तं कहरच झाला…
मह्याच मस्तीत विहरत असतांनी ,
अचानक तनकटाच्या दोरखंडांनी,
महे पायचं आवळून जागीच थिजवले…
तसं पाह्यलं तं त्या तणकटाचं,
मह्या मार्गावर,
अतिक्रमनचं व्हतं ते……!
मी पुर्ण ताकदीनिशी मुक्तं व्हवू पहातं व्हतो….
जोर जोरातं ओरडतं मदतीची याचना करत व्हतो….
पण कुनिही मह्या मदतीलं येतं नव्हतं….
जो तो मह्याकडं पाहूनं हसतं व्हता…
मी स्थितप्रज्ञ राहण्याचा प्रयत्न करतं व्हतो…..
पण न का जाने मह्याबी मनातं घालमेलं चालली व्हती….
क्षणातचं मह्याबी अंगावरं सळसळत्या गवताची,
हालचाल जानवाय लागली व्हती…
रोम आता राह्यलाचं नव्हता…
मह्या रोम रोमात तणकटं भिनतं व्हतं….
का मीच तणकटं बनतं व्हतो…?
मी भांबावलो,बावचळलो…..
सहज आजुबाजुलं पाह्यलं …..
आत्ता सगळ्या लोकांच्या डोक्यावरं
मलं तणकटं दिसतं व्हतं…..
अन त्याची मुळं,
आरपार मेंदुतं रूजलेली जानवतं व्हती…..
मी ओरडलो….तळमळलो….शेवटी हतबल झालो….
मग शेवटी त्या विधात्यालचं मनलो,
हे विधात्या…..,
तणनाशकानं शेतातल्या तनाचा नाश करता येईल रे….
पण मेंदुतल्या तनाचा नाश कुठल्या तननाशकानं करायचा…..?
©गोडाती बबनराव काळे
9405807079
Leave a Reply