नवीन लेखन...

तंत्रविश्व – भाग ७ : ऑनलाइन कोर्सेसच्या विश्वात

कोरोनामुळे बदलत असलेल्या  परिस्थितिमुळे  विविध साधक बाधक बदल आपल्या जीवनशैलीवर झाले व होत आहेत. शिक्षण क्षेत्रही त्याला अपवाद नाही. ऑनलाईन शिक्षण हे केवळ शालेय विद्यार्थ्यांपुरते मर्यादित राहीले नसून स्वतः चा व्यवसाय अधिक लोकांपर्यंत पोहोचवू इच्छिणारे व्यावसाईक, स्वतःचे कौशल्य व ज्ञान वाढवून  वरीष्ठ पद मिळवू इच्छिणारे नोकरदार,स्पर्धात्मक युगात स्वतःचा वेगळा ठसा उमटवू पाहणारे महत्वाकांक्षी विदयार्थी अशा समाजातील बहुतांश गटाला सध्या ऑनलाईन शिक्षण आणि त्या बाबतीतील कोर्सेसची आवश्यकता भासतेय. तुम्ही विद्यार्थी असा अथवा नोकरदार बदलत्या काळानुसार बदलणारे तंत्रज्ञान आणि त्यायोगे बदलणारी जीवनशैली स्वीकारणे आणि स्वतः ला सतत अपडेट ठेवणे ही काळाची गरज बनली आहे.

अर्थात ही गरज ओळखून तुमच्या गरजेनुसार तुम्ही ऑनलाईन शिकू शकणारे अनेक कोर्सेस आणि ते असणारे विविध शैक्षणिक संकेतस्थळ उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे यामध्ये मोफत ऑनलाईन कोर्सेस देखील उपलब्ध असतात.काहींचे कोर्स प्रमाणपत्र देखील मोफत मिळते तर काही कोर्सेसच्या प्रमाणपत्रासाठी काही रक्कम भरावी लागते.

भारतात सर्वाधिक लोकप्रिय आणि उपयुक्त अशा कोर्सेस असणारी संकेतस्थळ पुढील प्रमाणे आहेत.

1.udemy

Udemy हे ऑनलाईन कोर्सेस शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि शिकवू इच्छिणाऱ्या शिक्षकांसाठी देखील अतिशय उपयुक्त असे संकेतस्थळआहे.
माहिती तंत्रज्ञान, संगणकशास्त्र,कला,विज्ञान तंत्रज्ञान,अभियांत्रिकी, सामाजिक शास्त्रे, व्यक्तिमत्त्व विकास यांसारख्या अनेक विषयांवरील हजारो कोर्सेस येथे उपलब्ध आहेत.सशुल्क आणि मोफत अशा दोन्ही प्रकारचे कोर्सेस येथे आढळतात.

या वेबसाईटचे वेगळेपण म्हणजे तुम्ही शिक्षक असाल किंवा एखाद्या विषयाबाबत तुम्हाला विशेष माहिती असेल तर त्याबाबत येथे स्वतःचा कोर्स देखील अपलोड करू शकता आणि त्याद्वारे एक निश्चित उत्पन्न मिळवू शकता.

2.Google Courses

गुगलने आपल्या google digital unlock या नावाने काही मोफत ऑनलाईन कोर्सेस तयार केले आहेत. हे प्रमाणपत्रविना व प्रमाणपत्रसोबत अशा दोन्ही पद्धतीत उपलब्ध आहेत.
खासकरून माहिती तंत्रज्ञान, डिजिटल मार्केटिंग अशा ठराविक विषयावरील केवळ 36 कोर्सेसच येथे उपलब्द्ध आहेत.

3. NSDC eskill india

ही एक सरकारी वेबसाईट आहे.याचे कोर्सेस अँड्रॉइड अँपद्वारे आपल्या स्मार्टफोनवर देखील करता येतात, तसेच बहुतांश कोर्सेस हे मोफत उपलब्ध आहेत.माहिती तंत्रज्ञान, संगणक शास्त्र,व्यवस्थापन,व्यक्तिमत्त्व विकास ,डिजिटल मार्केटिंग यासारख्या कोर्सेस सोबत कॉम्प्युटर हार्डवेअर, मोबाईल रिपेरिंग,प्लंबर काम,शिवणकाम, इलेक्टिशिन यासारखे छोटे छोटे आणि
अतिशय उपयुक्त कोर्सेस येथे उपलब्द्ध आहेत,सोबत कोर्स पूर्ण केल्यानंतर त्याचे प्रमाणपत्र देखील मिळते,ज्याचा तुम्हाला कुठेही नोकरी मिळविताना वापर करता येऊ शकतो.

4.edX

या वेबसाईटवर तुम्हाला MIT,Harvard,Boston university यासारख्या जगातील टॉप युनिव्हर्सिटीचे ऑनलाईन कोर्सेस,डिग्री,डिप्लोमा मिळतील.या सर्व गोष्टी मोफत असून केवळ सर्टिफिकेट हवे असल्यास साठी पैसे भरावे लागतात.
अभियांत्रिकी, विज्ञान, कायदा,भाषा,सामाजिक शास्त्रे,कला,साहित्य,संगणक शास्त्र,व्यवस्थापन यांसारख्या विषयावरील 2500 हुन अधिक
कोर्सेस उपलब्ध आहेत. बहुतांश कोर्सेस मोफत असले तरी प्रमाणपत्रासाठी काही रक्कम भरावी लागते.

5.learnvern

या वेबसाईटवर तुम्हाला विशेषतः संगणकशास्त्र,डिजिटल मार्केटिंग या बाबतीतील कोर्सेस हिंदीमधून शिकता येतील.
विशेष म्हणजे हे कोर्सेस तुम्ही मोबाइलमध्ये  डाउनलोड करून ऑफलाइन पद्धतीने पूर्ण करता येतात. केवळ प्रमाणपत्र हवे असल्यासच काही रक्कम भरावी लागते, अथवा  हे कोर्सेस पुर्णतः मोफत उपलब्द्ध आहेत. खासकरून सॉफ्टवेअर प्रोफेशन असलेल्या व्यक्तींसाठी अतिशय उपयोगी अशी वेबसाईट!!

याशिवाय केवळ कोर्सेसच नाही तर तुम्हाला हव्या त्या विषयांची माहीती पुर्णतः मोफत आणि व्हिडिओच्या स्वरूपात देणारे माध्यम
म्हणून जगातील सर्वोत्कृष्ट ऑनलाईन लर्निंगचे  माध्यम असलेल्या youtube चा देखील तुम्ही प्रभावी वापर करू शकता.

— विजयकुमार काशिनाथ पाटील 

Avatar
About विजयकुमार काशिनाथ पाटील 11 Articles
नमस्कार मित्रांनो, मी..विजयकुमार पाटील...आपणासारखाच शब्दविश्वातील एक प्रवासी. व्यवसायाने इंजिनीअर असलो तरी मन पुस्तकातच अधिक रमतं. उत्तम पुस्तके,उत्तम चित्रपट आणि उत्तम मित्र यांचा संग्रह हा माझा छंद. वाचनाची आवड लहानपणापासून असली तरी लेखनास मात्र मी नुकतीच सुरुवात केली आहे.खुप वाचन केलं की आपणही काही लिहावं असं वाटू लागतं,त्या वाटण्यातून बरेच लेखन झालं.अमेझॉनवर माझी काही ebooks प्रकाशित झाली आहेत. तंत्रज्ञानाची आवड असल्याने बदलते तंत्रज्ञान सोप्या मराठी भाषेत समजावून सांगणारे 'मराठी technical vijay' हे youtube channal देखील मी नुकतेच सुरू केले आहे. मराठीश्रुष्टीच्या या माध्यमातून विविध विषयांवरील माझे लेखन आपल्या पर्यंत पोहचवण्याचा एक प्रयत्न आहे. तो कसा वाटला मला जरूर कळवा. धन्यवाद

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..