तनुजा यांचा जन्म एका चित्रपटसृष्टीशी निगडीत कुटुंबात झाला. त्यांचा जन्म २३ सप्टेंबर १९४३ रोजी झाला. बालपणी तनुजा यांना आई आणि आजीचे इतके प्रेम मिळाले, की ५० च्या दशकात त्यांना टॉम बॉय पुरस्कार मिळाला. त्या पार्टीमध्ये ग्लॅमरस ड्रेस परिधान करायच्या, खुलेआम सिगारेट आणि दारू पित होत्या. त्या काळातील ट्रॅडिशन अभिनेत्रींपेक्षा वेगळ्या तनुजा बिनधास्त आयुष्य जगत. त्याचा परिणाम अनेकदा त्याच्या सिनेमांवरसुध्दा दिसत होता. तनुजा यांना आजही ‘बहारें फिर आएंगी’, ‘ज्वेल थीफ’, ‘हाथी मेरे साथी’ आणि ‘अनुभव’ या सिनेमांसाठी ओळखले जाते. हिंदीव्यतिरिक्त त्यांनी मराठी, बंगाली आणि गुजराती सिनेमांमध्येही आपले टॅलेंट दाखवले आहे. समर्थ कुटुंबात जन्मलेल्या तनुजा यांचे पती दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर होते. तर आई शोभना समर्थ या प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. तनुजाच्या बालपणी त्यांचे आईवडील विभक्त झाले होते. तनुजा यांना त्यांची आई शोभना यांनी सिनेसृष्टीत लाँच केले होते. तनुजा यांच्या पहिल्या सिनेमाची निर्मिती शोभना समर्थ यांनी केली होती. तनुजा यांनी १९५० मध्ये ‘हमारी बेटी’ या सिनेमाद्वारे बालकलाकाराच्या रुपात फिल्मी करिअरला सुरुवात केली. मुख्य अभिनेत्री म्हणून १९६० मध्ये रिलीज झालेला ‘छबीली’ हा त्यांचा पहिला सिनेमा होता. मात्र १९६१ मध्ये रिलीज झालेल्या ‘हमारी याद आएगी’ या सिनेमाद्वारे त्यांना पहिल्यांदा यशाची चव चाखायला मिळाली.
स्वतःला यशस्वी अभिनेत्री म्हणून सिद्ध केल्यानंतर सुद्धा तनुजा यांची तुलना नेहमी बहीण नूतनसोबत होत राहिली. करिअरच्या काही वर्षांत वहिनी आणि सहायक अभिनेत्रींच्या भूमिका केल्यामुळे तनुजा यांचे फिल्मी करिअर हवे तसे यशस्वी होऊ शकले नाही. तनुजा आणि शोमू मुखर्जी (दिग्दर्शक-निर्माते) यांची पहिली भेट ‘एक बार मुस्कुरा दो’ या सिनेमाच्या सेटवर झाली होती. एका वर्षांच्या डेटिंगनंतर १९७३ मध्ये दोघांनी लग्न केले. मुख्य अभिनेत्री म्हणून यश न मिळाल्याने तनुजा यांनी पुढे सेकंड लीड भूमिका करण्यास सुरुवात केली. राज कपूर यांच्या ‘प्रेम रोग’मध्ये त्या अशाच भूमिकेत होत्या. बलराज साहनी यांचा मुलगा परीक्षित साहनीच्या पहिल्या ‘पवित्र पापी’ सिनेमात तनुजा यांनी अविस्मरणीय अभिनय केला. त्यानंतर त्या, भाभी, मावशी आणि आई भूमिका साकारू लागल्या. त्यांनी काही मालिकांमध्येसुध्दा काम केले. ‘एन ऑगस्ट रेक्विम’ नावाच्या इंग्रजी सिनेमातसुध्दा तनुजा झळकल्या होत्या. २०१२ मध्ये रिलीज झालेल्या ‘सन ऑफ सरदार’मध्ये त्या दिसल्या होत्या. या सिनेमात काजोलचा पती आणि तनुजा यांचा जावई अजय देवगण मुख्य भूमिकेत होता.
तनुजा यांनी छबीली, बहारें फिर आएंगी, ज्वेल थीफ, हाथी मेरे साथी, मेरे जीवन साथी, अमीर-गरीब, याराना, सोनी महिवाल, ‘आज और कल’, ‘बहारे फिर भी आएगी’, ‘दो चोर’, ‘दो दूनी चार’, ‘घराना’, ‘हाथी मेरे साथी’, ‘ज्वेल थीफ’, ‘जीयो और जीने दो’ आणि ‘प्रेमरोग’सारखे हिट सिनेमे केले आहेत. त्यांना दोन उत्कष्ट सहायक अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. २०१४ मध्ये त्यांना फिल्मफेअर कडून जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.विकिपीडिया
Leave a Reply