तप्त हृदयाला शांतवी,
त्याला मित्र म्हणावे,
रुक्ष मनाला पालवी,
त्याला दोस्ती म्हणावे,–!!!
वियोगाचे दुःख भोगी,
त्यात समजावे त्याला,
याच दुःखा हलके करुनी,
प्रेम करे, तो सखा सोबती,–!!!
संतापलेल्या मनींचे,
ओरखाडे मिटवी तो,
जो अशी साथ देई,
त्याला मित्र म्हणावे,–!!!
कडक उन्हात जो गारवा,
आपणहून जिवां देई,
हाताला धरून सावलीला,
जो स्वतः आणून बसवी,–!!!
थेंबभर अश्रू पाहुनी डोळा,
आपसूकच ज्याचे डोळे भरती, चटकलेल्या हृदयावरती,
फुंकर घालण्या जे उठती,–
अशी दोन हृदये एक असती,
त्यांनाच मित्र म्हणावे,–!!!
कोसळणाऱ्याला सावरणे,
ज्यांना ठाऊक असते ,
अवघड प्रसंगी हात देऊनी,
मैत्री अलगद आधार देते,–!!!
माहीत ज्यांना,मधाळशब्दांनी, जखमेवर औषध लावणे,
संकटात मग पुढे येऊनी,
स्वतः फक्त मदत करणे,–!!!
दोस्त असे मैत्रीस पात्र,
अशी करावी खरी दोस्ती,
थंडीत बनती उब जे,—
उन्हाळ्यात घनगर्द सावली,–!!!
अडचणीत बनती दिलासा पावसात धरती छत्र,
रक्ताचे नाते नसूनही,
जे असती एकरूप ,–!!!
अशा एकजीवी सोबतीस,
खराच मित्र म्हणावे,
मीच्याही पुढेच जाऊनी,
एकमेकां तारत रहावे,–!!!
हिमगौरी कर्वे©
Leave a Reply