तारकापुंजाची ताराराणी, ऐकते तुझे मनोगत,
कथा व्यथा सारी कहाणी,
समजते ग मज नकळत, –!!!
रंग तुझा चमकदार, दुधी,
पसरत नभी मंद प्रकाश,
उजळतेस कशी आकाशी
स्वयंप्रकाशी झगमग झगमग,–!
चंद्रराजाच्या जनानखानी,
अस्तित्व कसे तुझे ठळक,
किती राण्या असून भोवताली, तुझ्यावर त्याची मेहरनजर ,–!!!
तरीही भासशी किती एकाकी,
काय सोसशी अंतरी दुःख,
तोंड मिटुनी गप्प राहशी,
कधी लपवत आपले तेज,–!!!
अमावस्या येता जवळी,
कुढत कुढत आंत हृदयात, कोपऱ्यात उभी अवकाशी, कवटाळत फक्त एकांत,–!!!
चंद्राची तू खास राणी,
काय सल अंत:करणात,
जसा जसा तो पुढे जाई,
भरले डोळे सारखे वाहत,–!!!
सुधाकराने सेवा दिधली, कर्तव्यकठोर सारेच ब्रम्हांड, एकट्या ,–तुझा तो नाही,
जाणून घे आतल्या आत ,–!!!
जसा खेळतो लपाछपी,
इतर चांदण्या होती अधीर, ढगांआडून तो तुलाच पाही रजनीनाथ कसा चतुर,–!!!
© हिमगौरी कर्वे
Leave a Reply