नवीन लेखन...

तरुणाईचा मोहर (अविष्कार) : डॉ. निरंजन करंदीकर

डॉ. निरंजन करंदीकर M.S., Ph.D.

गणपती विसर्जनाचा मासुंदा तलावावर होणारा परिणाम हा १९९८ साली राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत जिज्ञासाच्या नववीतल्या बाल वैज्ञानिकांनी सादर केला होता. हा प्रकल्प केवळ ठाणे शहरातील अथवा महाराष्ट्रातील नव्हे तर देशाच्या पर्यावरण चळवळीतील एक मोठा क्रांतीकारी टप्पा ठरला.

या प्रकल्पाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांनी केलेल्या एका वैज्ञानिक प्रकल्पाची सामाजिक चळवळीत रुपांतर झाले होते. या चळवळीचे पडसाद देशभर पसरले. दुसरे आणि अतिशय महत्वाचे म्हणजे या संशोधन प्रकल्पांचे दस्तऐवज (documents)कै. नरेंद्र दाभोळकर यांनी जलप्रदूषण संदर्भातील औरंगाबाद हायकोर्टात सादर केलेल्या जनहित याचिकेत दाखला म्हणून वापरले गेले. या खटल्याच्या निकालपत्रात मा. न्यायमूर्तींनी केंद्र सरकारला कायदा बनविण्याचे आदेश दिले होते. याचा परिणाम म्हणून भारत सरकारने जल प्रदूषण कायदा लागू केला. आज प्रदूषणमुक्त गणपती उत्सव हा सर्वोमुखी झालेला शब्द आहे.

प्रकल्पाचा गट नेता, निरंजन याने अगोदरच्या वर्षी म्हणजे १९९७ साली राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत ‘मधल्या सुट्टीतील डबा’ हा प्रकल्प सादर केला होता. त्यामुळे त्याला प्रकल्प कृतीची कल्पना होती. या प्रकल्पात शालेय विद्यार्थ्यांचा वाढत्या वयात, त्यांना लागणारी ऊर्जा व त्यासाठी लागणारे कैलारीयुक्त अन्न, त्याची चव तयार करण्यासाठी लागणारा वेळ अशा सर्व घटकांचा अभ्यास करून मधल्या सुट्टीच्या डब्याचा आठवड्याचा मेनू तयार केला होता.

गणपती विसर्जन प्रकल्पात निरंजनचे सहकारी होते अमोघ वैशंपायन, वरूण चौबळ आणि देवदत्त जोशी. अमोघ आणि वरूण दोघेही वैद्यकीय अभ्यासक्रमात उच्च पदवीधर झाले आहेत. देवदत्तने अमेरिकेत M.S.पदवी आता अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रात तांत्रिक सल्लागार म्हणून कार्यरत आहे.

हे विज्ञान संशोधन प्रकल्प या शाळकरी बाल वैज्ञानिकांनी बी.एन. बांदोडकर महाविद्यालयातील तत्कालीन प्राध्यापिका डॉ. माधुरी पेजावर, डॉ. नागेश टेकाळे आणि आय.आय. टी. मुंबईचे प्राध्यापक डॉ. श्याम असोलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते. शाळकरी वयात पेरलेले हे संशोधनाचे बीज शाळा, घर आणि जिज्ञासाच्या सकस वातावरणात तरुणपणी बहरले तर नवल नाही. या दोन्ही प्रकल्पात सहभागी झालेले सर्व विद्यार्थी आज उच्च विद्याविभूषित आहेत आणि विज्ञानाच्या विविध शाखेत कार्यरत आहेत.

गटप्रमुख निरंजन Ph.D. पदवी मिळून संशोधन क्षेत्रातील आपली वाटचाल चालू ठेवली आहे. ठाण्यात ब्राह्मण सोसायटीत राहणारे प्रतिभा आणि दिलीप करंदीकर निरंजन हाधाकटा मुलगा. दहावी पास झाल्यावर बारावीचा धोपटमार्ग न घेता त्याने इलेक्ट्रीकल इंजिनिअरींगचा डिप्लोमा पूर्ण करून पदवी शिक्षण पूर्ण केले. अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास,अरलिंग्टन येथून इंजिनिअरींग विषयातून मास्टर ऑफर सायन्स ही पदवी (M.S.) इलेक्ट्रौनिक इंजिनिअरींगमध्ये मिळवली. त्याच विद्यापीठातून पाच वर्षाचा अभ्यास आणि संशोधनातून Ph.D. पदवी ग्रहण केली. या दरम्यान २००६ साली विद्यापीठाकडून सर्वौत्कृष्ठ मार्गदर्शक Best Mentor हा पुरस्कार मिळाला. पीएच.डीच्या प्रशिक्षण काळात डीनस डॉक्टोरेल फेलोशिप व SIEM फेलोशिप मिळाली. अभ्यासातील उत्तम कामगिरीसाठी असणारी ब्लैक बेरी शिष्यवृत्तीसुद्धा त्याला २०११-२०१२ च्या वर्षाकरतासन्मानित केली गेली.

निरंजनचा Ph.D. चा संशोधनाचा हा विषय देशातील करोडो मधुमेही रुग्णांना दिलासा देणारा आहे. आज देशातील सात कोटी मधुमेह पिडीत लोकांचे डोळे, मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका आहे. या आजारामुळे दरवर्षी असंख्य व्यक्ती बळी पडता आहेत. मधुमेह आजार शोधण्याचे प्रमुख साधन म्हणजे रक्तपेशी मधील ग्लूकोजची तपासणी करणे व ती मर्यादित ठेवणे. नवीन शोधांमुळे डोळ्यातील पाण्यासारखी इतर जैविकद्रव्ये यांची तपासणी करून ग्लूकोजची पातळी ओळखता येते. ग्लूकोजमध्ये विद्युतप्रवाह (करंट) असतो. नवीन Micro Electro Mechanical System (MEMS) अद्ययावत तंत्रज्ञानामुळे अनेक जैविक सेन्सर शोध लागलेला आहे, हे सेन्सर बाह्य स्पर्शाने (Non Invasive) किंवा कमीत कमी टोचून (Less Invasive) रक्त अथवा डोळ्यातील पाण्यातील ग्लूकोजचे प्रमाण ओळखतात. सध्या अस्तित्वात असलेल्या सर्किट डिझाईनमध्ये दोन वेगळे सर्किट्स असतात. एका सर्किटमुळे रिअॅक्शनपोटेंशीयल कंट्रोल करता येते, तर दूसरे सर्किट रिअॅक्शनविद्युत प्रवाहाची (करंट) नोंद करते. यासाठी साहजिकच दोन वेगळ्या सर्किटमुळे ऊर्जा जास्त वापरली जाते. या विद्युतप्रवाहात अवाजवी घटकपण (Noises) असतात. यामुळे येणारे रिझल्ट हे तेवढे अचूक नसतात. निरांजनने आपल्या संशोधनातून एकच डिझाईनमध्ये दोन नवीन सर्किटस तयार केली आहेत. त्याला wide dynamic range architecture म्हणतात. पहिले सर्किटस रक्तातील ग्लूकोज तपासते आणि दुसरे सर्किट रक्त अथवा डोळ्यातील पाण्याची ग्लूकोज तपासतात. हे नवीन जैविक सेन्सरला हाताळायला सोपे आणि सोईचे आहे आणि त्याचबरोबर अवाजवी घटक (Noises) चा अडथळा दूर करते त्यामुळे ही पद्धत जास्त अचूक आहे आणि उर्जापण कमी लागते. या शोधाचे पुढचे पाऊल म्हणजे भविष्यात डोळ्यातील लेन्समध्येसुद्धा हे सेंसर लावता येतील. त्यामुळे शरीरातील ग्लूकोजचे प्रमाण कमी जास्त झाल्याचे लगेच लक्षात येईल. सध्या निरंजन इंटेल, कॉलीफोर्निया येथे बिनतारी तंत्रज्ञान (wireless communication) काम करीत आहे. इंटेलमध्ये सर्वोत्तम शोधाचा पुरस्कार (outstanding innovation) त्याला मिळाला आहे. निरंजनला त्याच्या पुढच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा.

सुरेंद्र दिघे
कार्यकारी विश्वस्त – जिज्ञासा ट्रस्ट ठाणे
surendradighe@gmail.com

सुरेंद्र दिघे
About सुरेंद्र दिघे 11 Articles
श्री सुरेंद्र दिघे हे ठाणे येथील सरस्वती मंदिर ट्रस्टचे विश्वस्त आहेत. ते शालेय विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेल्या जिज्ञासा या संस्थेचेही विश्वस्त आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..